कोलकात्यातील युवतीवर बलात्कारप्रकरणी इराणी नागरिकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 08:30 PM2019-01-29T20:30:38+5:302019-01-29T20:30:43+5:30
कोलकात्यातील 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी मजिद अजीज (27 वर्ष) या इराणी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. 20 जानेवारीला आरोपी मजिदनं तरुणी बलात्कार केला.
म्हापसा : कोलकात्यातील 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी मजिद अजीज (27 वर्ष) या इराणी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. 20 जानेवारीला आरोपी मजिदनं तरुणी बलात्कार केला. ही तरुण गेल्या दोन महिन्यांपासून येथे ग्राफिक्स डिझायनर म्हणून काम करत होती. याप्रकरणी पेडणे पोलिसांनी 28 जानेवारीला अटक केली.
पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलकात्यातील ही युवती हरमल येथे वास्तव्यास होती. संशयित आणि तिची मैत्री असल्याने ती दोघेही किनारी भागात एका पार्टीत सहभागी झाले होते. त्यानंतर दोघेही रात्री देऊळवाडा-हरमल येथील संशयिताच्या भाड्याच्या खोलीवर गेली. यावेळी आरोपीनं बलात्कार केल्याची तक्रार तिनं पोलिसांमध्ये २८ जानेवारीला केली. यानंतर पोलिसांनी तातडीनं संशयिताला अटक केली. 29 जानेवारीला दोघांनाही मेडिकल तपासणीसाठी पाठवण्यात आले.
संशयित मजिद अजीज याला २०१८ साली वागतोर येथे ड्रग्स प्रकरणीही अटक केली होती. नोव्हेंबर २०१८ साली त्याला जामिनावर सोडले होते आणि आता बलात्कार प्रकरणात त्याला पेडणे पोलिसांनी अटक केली. पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर धाटकर पुढील तपास करीत आहे .