गोवा हे अवैद्य दारु व्यापाराचे केंद्र; आपचे समन्वय ॲड. अमित पालेकरांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2023 03:43 PM2023-10-15T15:43:19+5:302023-10-15T15:43:40+5:30
काणकाेण येथील अबकारी चेकपोस्टवर झालेल्या घोटाळ्याची पाळेमुळे सरकारला माहित आहे.
नारायण गावस
पणजी: गोवा हे अवैद्य दारु व्यापाराचे केंद्र झाले आहे. गोव्यातून बेकायदेशीर दारु परराज्यात पाठविली जात आहे. अबकारी खात्याला याच्यावर नियंत्रण आणण्यास अपयश आले आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी केला.
काणकाेण येथील अबकारी चेकपोस्टवर झालेल्या घोटाळ्याची पाळेमुळे सरकारला माहित आहे. पण मुख्यमंत्री यावर काहीच कडक पाऊले उचलत नाही. काणकाेण चेकपाेस्ट नाक्यावर अवैद्य दारु परराज्यात पाठविण्यासाठी काही अबकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा या दलालांना पाठींबा मिळाला आहे. या अगाेदर अबकारी खात्याचे कर्मचारी सिमेवर तपास करताना घोटाळा केल्याच्या घटना उघड झाल्या होत्या. गुजरात न्यायालयाच्या निकषावर प्रतिक्रीया देताना अमित पाटकर म्हणाले. मी जे या अगोदर बाेललो होतो ते खरे झाले आहे. गाेव्यातून सुरु हाेणारा अवैद्य दारुचा वापर उघडकीस आला आहे. यात जे सहभागी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहीजे. पाेलीस महासंचालकांनी यात हस्तक्षेप करणे गरजेचे आहे, असेही ॲड. अमित पालयेकर म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अबकारी खाते आहे. पण या खात्यात जो घोटाळा भ्रष्टाचार सुरु आहे. याकडे नियंत्रण ठेवण्यात त्यांना अपयश आले आहे. म्हणून बकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांकडून तपास सिमेवरुन माेठ्या प्रमाणात अवैद्य दारु तसेच इतर गाेष्टी पाठविल्या जात आहे. काही दिखाव्यासाठी दारु पकडल्याचे दाखविले जात आहे. काणकोण येथील अबकारी घोटाळ्याची पाळेमुळे तपासणे गरजेचे आहे. पण सरकार यात हलगर्जीपणा करत आहे, असेही ॲड. पालेकर म्हणाले.