गोव्यात जयेश साळगावकर भाजपवासी, रवी नाईकही आहेत त्याच वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 07:50 AM2021-12-04T07:50:58+5:302021-12-04T07:51:22+5:30
BJP News: गोवा फॉरवर्डचे आमदार व माजी मंत्री जयेश साळगावकर यांनी गुरुवारी पक्षाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पणजी : गोवा फॉरवर्डचे आमदार व माजी मंत्री जयेश साळगावकर यांनी गुरुवारी पक्षाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे एक बडे नेते रवी नाईक हेही रविवारी भाजपात प्रवेश करणार आहेत. तेही आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. रवींना भाजपमध्ये घेतल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.
साळगावकर यांनी गोवा फॉरवर्ड पक्ष सोडल्यानंतर विजय सरदेसाई यांचे राजकीय वजन कमी झाले आहे. रवी नाईक यांना भाजपमध्ये घेऊन मगो पक्ष व सुदिन ढवळीकर यांचे राजकीय वजनही कमी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
मंत्रीपदाचामार्ग मोकळा?
रवी नाईक यांचे दोन्ही पुत्र अगोदरच भाजपमध्ये गेलेले आहेत. कदाचित सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या मंत्र्यांला डच्चू देत रवींचा मंत्रीपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. गोवा फॉरवर्डचे आणखी एक आमदार आणी माजी मंत्री विनोद पालयेकर हेही भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.