Goa: गोवा ब्रॉडबँड कंत्राटावरून विधानसभेत खंवटे सरदेसाईत खडाजंगी, १८२ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
By वासुदेव.पागी | Published: July 31, 2024 05:07 PM2024-07-31T17:07:52+5:302024-07-31T17:11:46+5:30
Goa News: गोवा ब्रॉडबेंड मुद्द्यावरून माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोह खंवटे आणि विजय सरदेसाई यांची विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला खडाजंगी पाहायला मिळाली. युटीएल स्विकारण्या ऐवजी. जीबीबीएलकडे हा प्रकल्प देऊन १८२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला.
- वासुदेव पागी
पणजी - गोवा ब्रॉडबेंड मुद्द्यावरून माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोह खंवटे आणि विजय सरदेसाई यांची विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला खडाजंगी पाहायला मिळाली. युटीएल स्विकारण्या ऐवजी. जीबीबीएलकडे हा प्रकल्प देऊन १८२ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला. यावर सभागृह समिती नियुक्त करून चौकशीची मागणीही त्त्यांनी केली.
मुद्दा होता गोव ब्रॉडबेंड इंटरनेट कनेक्टीव्हीचा जीबीबीएनच्या कंत्राटात चारवेळा मूदतवाढ देण्यात का आली आणि वर्ष २०२७ पर्यत हा प्रकल्प कसा काय नेऊ शकता असा प्रश्न सरदेसाई यांनी केला होता. २०१५ मध्ये लेखामहापालाने या प्रकल्पाच्या कंत्राटावर कठोर ताशेरे ओढले होते. खुद्द खंवटे हे विरोधात असताा या प्रकल्पाच्या विरोधात सभागृहात बोलत होते. आता सत्ताधारीपक्षात जाऊन मंत्री बनल्यानंतर त्यांनी सातत्याने या कंत्राटाच्या मूदतीत वाढ का करण्यात आली याची चौकशी हवी अशी. हा फार मोठा घोटाळा असून सभागृह समिती काढून याची चौकशी केली जावी अशी त्यांची मागणी होती.
मात्र मंत्री खंवटे यांनी सरदेसाई यांचे आरोप फेटाळताना सरदेसाई दिशाभूल करीत असल्याचे सांगितले. गोवा ब्रॉडबँड प्रकल्प हा केंद्राच्या पैशातून होत असल्यामुळे गोव्यावर खर्चाचा बोजाही पडणार नाही असे त्यांनी सांगितले. या कंत्राटासाठी मंत्रीमंडळाची प रवानगी घेतली नसस्याचा आरोपही त्यांनी फेटाळला.
तुम्हाला यायला मिळाले नाही
सरदेसाई हे सातत्याने खंवटे यांना भाजपात जाऊन पवित्र बनल्याचा टोमणा मारत होते. तसेच ज्या प्रकल्पावर ते टीका करीत आहेत तोच प्रकल्प आता मंत्रीबनून पुढे नेत आहेत असे सांगत होते. त्यावर खंवटे यांनी त्यांना प्रतिटोला हाणताना सांगितले की तुम्हाला यायला मिळाले नाही म्हणून तुम्ही हे असे बोलत आहात काय?