CoronaVirus गोव्यात कोविडमुळे आठवडाभरात चाळीसजण दगावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 08:00 PM2020-08-26T20:00:51+5:302020-08-26T20:00:58+5:30
कोविडमुळे होणारे मृत्यू आरोग्य खात्याची यंत्रणा अजून थांबवू शकलेली नाही.
पणजी: राज्यात 497 नवे कोविडबाधित बुधवारी आढळले. यामुळे राज्यातील सक्रिय कोविड रुग्णांची एकूण संख्या 3 हजार 351 झाली आहे. आठ कोविडग्रस्तांचा बुधवारी मृत्यू झाला. कोविडने मरण पावलेल्या रुग्णांची एकूण संख्या 165 झाली. यापैकी 4क् रुग्ण हे गेल्या अवघ्या आठवडाभरात दगावले आहेत.
कोविडमुळे होणारे मृत्यू आरोग्य खात्याची यंत्रणा अजून थांबवू शकलेली नाही. कोट्यावधी रुपये सरकार कोविड व्यवस्थापनावर खर्च करते पण को-मॉर्बिड स्थितीतील कोविडग्रस्तांचा कोविडमुळे बळी जात आहे. अशा बळींची संख्या रोज वाढत चालली आहे. मंगळवारी नऊजणांचा मृत्यू झाला होता तर बुधवारी आठजण मरण पावले व त्यात फातोर्डामधील तिघांचा समावेश आहे.
म्हापसा, सावर्डे, आर्ले, चिंचिणी व वास्को येथील एकाचा बळी गेला. आर्ले येथील 43 वर्षीय कोविडग्रस्ताचा मडगावच्या ईएसआय इस्पितळात मृत्यू झाला. सावर्डे येथील 60 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. पेडे म्हापसा येथील 64 वर्षीय महिलेचा कोविडने जीव घेतला. तिला मृतावस्थेतच म्हापसा येथील सरकारी इस्पितळात आणण्यात आले होते. तिला कोविड होता हे नंतर स्पष्ट झाले.
गेल्या दि. 19 ऑगस्टपासूनची आकडेवारी जर पाहिली तर आठवडाभरात चाळीसहून जास्तच व्यक्तींचा कोविडने बळी घेतल्याचे दिसून येते. पणजी, साखळी, मडगाव आदी विविध भागांतील रुग्णालयांच्या क्षेत्रत कोविडचे रुग्ण वाढले आहेत.
आरोग्य केंद्र क्षेत्रनिहाय कोविडग्रस्तांची संख्या
डिचोली- 36
साखळी- 94
पेडणो- 96
वाळपई- 97
म्हापसा- 146
पणजी- 163
बेतकी- 75
कोलवाळे- 111
चिंबल- 121
पर्वरी- 172
सांगे- 39
शिरोडा- 61
फोंडा- 224