सुरक्षेवर २२६ कोटी खर्च करूनही ५६ जम समुद्रात बुडालेच कसे?

By वासुदेव.पागी | Published: July 17, 2024 12:48 PM2024-07-17T12:48:43+5:302024-07-17T12:50:21+5:30

युरी आलेमाव यांचा विधानसभेत सरकारला प्रश्न

Goa leader of Opposition Yuriy Alemav raised the question in why 56 people drowned in the sea | सुरक्षेवर २२६ कोटी खर्च करूनही ५६ जम समुद्रात बुडालेच कसे?

सुरक्षेवर २२६ कोटी खर्च करूनही ५६ जम समुद्रात बुडालेच कसे?

पणजी : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दृष्टी एजन्सीला  २२६ कोटी रुपये खर्च करूनही ५६ जणांचा समुद्रात बडून मरण का आले असा प्रश्न विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी विधानसभेत उपस्थित केला. 

दृष्टी जीवरक्षक एजन्सीचे जीवरक्षक असतानाही आणि या एजन्सीवर मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला अतानाही लोक समुद्रात बडून का मरतात असा प्रश्न त्यांनी केला. तसेच एजन्सीच्या कंत्राटाचे नूतनीकरण करण्या विलंब का करण्यात आला असाही प्रश्न त्यांनी विचारला. 

मात्र हा दावा फेटाळताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दृष्टी जीवरक्षामुळे लोकांचे प्राण वाचल्याचा दावा केला. अनेकांना या एजन्सीने बुडताना वाचविले. मागील चार ते ५ वर्षात ४०० जणांना वाचविण्यात आले. २००८ पासून आतापर्यंत १२३७  जणांना वाचविण्यात आले असे त्यांनी सांगितले. परंतु यावर युरी आलेमाव हे त्यांना प्रति प्रश्न करताना म्हणाले की  मी तुम्हाला बुडालेल्या लोकांबद्दल विचारतो तर तुम्ही मला वाचविण्यात आलेल्यांची माहिती देता. 

त्यांचा हा वाद बराच लांबला. सभापतीनी युरी यांना त्यांच्या पुढचा पुरवणी प्रश्न विचारण्यास सांगितला. त्यावेळी त्यांनी दृष्टीबरोबरच्या कंत्राटाचे नूतनीकरण का करण्यात आले नाही असे विचारले. त्यावेळी खंवटे यांनी पुढील ३ महिन्या् च्या काळात ही कंत्राटे होतील असे सांगितले. 

एजन्सीकडे असलेल्या साधन सुविधांचे परीक्षण दर वर्षी केले जात असल्याचेही खंवटे यांनी सांगितले. आतापर्यंत या एजन्सीला ठोठावण्यात आलेला दंड अजून का वसूल करण्यात आला नाही असा प्रश्न विचारला.

Web Title: Goa leader of Opposition Yuriy Alemav raised the question in why 56 people drowned in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.