सीआरझेड उल्लंघनात गोवा आघाडीवर; राज्यात पाच वर्षात सर्वाधिक ९७४ प्रकरणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 01:05 PM2023-02-07T13:05:19+5:302023-02-07T13:06:48+5:30

केंद्रीय पर्यवरण राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे यांनी ही माहिती दिली आहे.

goa leads in crz violations 974 cases highest in five years in the state | सीआरझेड उल्लंघनात गोवा आघाडीवर; राज्यात पाच वर्षात सर्वाधिक ९७४ प्रकरणे

सीआरझेड उल्लंघनात गोवा आघाडीवर; राज्यात पाच वर्षात सर्वाधिक ९७४ प्रकरणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सीआरझेड उल्लंघनात गोवा आघाडीवर असून पाच वर्षांत केवळ गोव्यातच ९७४ उल्लंघनाची प्रकरणे नोंद झाल्याची माहिती राज्यसभेतील उत्तरातून पुढे आली आहे. केंद्रीय पर्यवरण राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे यांनी ही माहिती दिली आहे.

या कालावधीत देशभरात १८७८ सीआरझेड उल्लंघने झाली. किनारी राज्यांमध्ये महाराष्ट्रात ५५६, कर्नाटकात १०१ व तामिळनाडून ८४ प्रकरणे नोंद झाली. इतरत्रही अशी काही प्रकरणे आहेत. किनाऱ्यांबरोबरच नद्या, नाले, खाड्या, तलाव तसेच सर्वप्रकारच्या पर्यावरणीयदृष्ट्या पाणथळ जागांवर झालेल्या सीआरझेड उल्लंघनांची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने घेतली आहे. खारफुटींच्या ठिकाणी झालेला मानवी हस्तक्षेपही कारणीभूत आहे. खारफुटींच्या जागा बुजवून तेथे अतिक्रमणे करण्यात आल्याची प्रकरणे मध्यंतरी उघडकीस आली होती. त्याच्यावर काही प्रमाणात कारवाईही करण्यात आली आहे.

गोवा पर्यटनस्थळ असल्याने किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात हॉटेल बांधकामे येतात. अनेकदा सीआरझेड उल्लंघनाची प्रकरणे न्यायालयात पोहोचतात. राज्यात पर्यावरण वाचवण्यासाठी वावरणाऱ्या बिगर शासकीय संघटना सक्रिय आहेत. गोवा फाउंडेशनसारख्या संघटनेने सीआरझेड उल्लंघनाची अनेक प्रकरणे कोर्टात नेली आहेत.

ऑगस्ट २०२२ मध्ये संसदेत सरकारी ऑडिटरने अहवाल सादर केला. यावेळी काही मुद्दे लक्षात आणून दिले होते. काही बाबतीत एक्स्पर्ट अप्रायझल कमिटीने प्रकल्पांना दिलेले पर्यावरणीय परवाने वादात सापडले आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: goa leads in crz violations 974 cases highest in five years in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा