Goa: मटका कायदेशीर कराः गोवा विधानसभेत  सत्ताधारी आमदाराची मागणी

By वासुदेव.पागी | Published: July 26, 2023 04:34 PM2023-07-26T16:34:54+5:302023-07-26T16:35:17+5:30

Goa Assembly : सध्याच्या स्वरूपातील मटका बेकायदेशीर असल्यामुळे तो लॉटरीअंतर्गत आणून कायदेशीर करण्यात यावा, अशी मागणी भाजप  आमदार मायकल लोबो यांनी केली.

Goa: Legalize Matka: Demand of ruling MLA in Goa Assembly | Goa: मटका कायदेशीर कराः गोवा विधानसभेत  सत्ताधारी आमदाराची मागणी

Goa: मटका कायदेशीर कराः गोवा विधानसभेत  सत्ताधारी आमदाराची मागणी

googlenewsNext

- वासुदेव पागी

पणजी - बऱ्याच वर्षांनंत गोवा विधानसभेत पुन्हा एकदा मटका कायदेशीर करण्यासंबंधी मागणी करण्यात आली.  सध्याच्या स्वरूपातील मटका बेकायदेशीर असल्यामुळे तो लॉटरीअंतर्गत आणून कायदेशीर करण्यात यावा, अशी मागणी भाजप  आमदार मायकल लोबो यांनी केली.

मटक्यावर बंदी असली तरी मटक्यावर कोट्यवधी रुपयांची उलाडाल होत आहे ही वस्तुस्थिती आहे. परंतु मटका बेकायदेशीर असल्यामुळे याचासरकारी तिजोरीला एकही पैसा मिळत नाही. त्यामुळे हा बेकायदेशीर मटका कायदेशीर करून लॉटरीच्या अंतर्गत आणावा. त्यामुळे सरकारलाफार मोठा महसूल मिळू शकेल जो महसूल लोकांसाठी वापरता येईल असे ते म्हणाले.

दाबोळी विमानतळावरील उडाणे आता हळू हळू  मोपात स्थलांतरीत झाली आहेत. ही धोक्याची घंटा असून यामुले दाबोळी विमानतळ बंदपडण्याची भितीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे यापुढे आणखी उडाणे दाबोळीतून मोपाला न्यायला देऊ नका. तशी मागणी केंद्राकडे करा अशी मागणी त्यांनी केली.

यापूर्वी माजीमंत्री दयानंद मांद्रेकर विरोधी पक्षाचे आमदार असताना त्यांनी अशीच मटका कायदेशीर करण्याची मागणी केली होती. त्यावरतत्कालीन सभापती प्रतापसिंग राणे यांनी त्यांना विनोदाने  तुमचे सरकार जेव्हा गोव्यात येईल तेव्हा तुम्ही मटका कायदेशीर करा असे सांगितलेहोते.

Web Title: Goa: Legalize Matka: Demand of ruling MLA in Goa Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा