गोव्याचे विधानसभा अध्यक्षांच्या कारला झुवारी पुलावर अपघात; तवडकर थोडक्यात बचावले
By वासुदेव.पागी | Updated: July 18, 2024 16:04 IST2024-07-18T16:04:30+5:302024-07-18T16:04:48+5:30
कारचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे कऴते. त्यांच्या कारमध्ये त्यांच्यासह एकूण सहाजण होते.

गोव्याचे विधानसभा अध्यक्षांच्या कारला झुवारी पुलावर अपघात; तवडकर थोडक्यात बचावले
पणजी : गोवा विधानसभेचे अध्यक्ष सभापती रमेश तवडकर यांच्या कारला बुधवारी नवीन झुवारी पुलावर अपघात झाला. अधिवेशनासाठी सकाळी काणकोणहून पर्वरीला येत असताना त्यांची कार झुवारी पुलावर कठड्याला धडकली. एअरबॅग उघडल्यामुळे सभापतींसह कारमधील सर्व सहा जण बचावले.
कारचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे कऴते. त्यांच्या कारमध्ये त्यांच्यासह एकूण सहाजण होते. पुलाच्या कठड्याला कार आदळली. अपघातामुळे कारमधील एअरबॅग उघडल्या गेल्या. त्यामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. कारमध्ये असलेले आम्ही सगळेच एका मोठ्या दुर्घटनेतून वाचलो असे तवडकर म्हणाले.
विठ्ठलाची कृपा
हा अपघात बुधवार दि. १७ जुलै रोजी, म्हणजेच आषाढी एकादशीच्या दिवशी झाला. या अपघातातून आम्ही सर्वजण सुखरूप बचावलो ती श्री विठ्ठलाचीच कृपा असे लोकमतशी बोलताना सभापती तवडकर म्हणाले.