Goa: गोव्यात जीवरक्षकांनी वाचवले बुडणाऱ्या सात पर्यटकांचे प्राण
By किशोर कुबल | Published: August 17, 2023 07:33 PM2023-08-17T19:33:52+5:302023-08-17T19:34:20+5:30
Goa: विकएंडला जोडून स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आल्याने गोव्यात पर्यटकांची धूम असताना किनाय्रांवर बुडताना जीवरक्षकांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये सातजणांना वाचवले.
- किशोर कुबल
पणजी - विकएंडला जोडून स्वातंत्र्यदिनाची सुट्टी आल्याने गोव्यात पर्यटकांची धूम असताना किनाय्रांवर बुडताना जीवरक्षकांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये सातजणांना वाचवले.
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळे पाण्यात उतरण्यास मनाई असताना अनेक पर्यटक सूचना न जुमानता पाण्यात उतरतात. त्यामुळे बुडण्याचे प्रकार घडतात. सोमवारी कळंगुट किनाऱ्यावर पवई,मुंबई येथील एका ४० वर्षीय पर्यटकाला दृष्टी लाइफ सेविंग कंपनीच्या तैनात जीवरक्षकांनी वाचवले. हा पर्यटक दारुच्या नशेत होता. याच किनाय्रावर सोमवारी उत्तर प्रदेशच्या २४ वर्षीय पर्यटकाला बुडताना वाचवले. पाचजणांचा गट पाण्यात उतरला होता त्यातील एकजण गटांगळ्या खाऊ लागला.
कळंगुट किनाय्रावरच मुंबईच्या ३२ वर्षीय आणि कर्नाटकच्या ३५ वर्षीय युवकाला बुडताना वाचवण्यात आले. बागा येथे पश्चिम बंगालच्या दोघांना जीवरक्षकांनी वाचवले. तर दक्षिण गोव्यात केळशी किनाय्रावर उत्तर प्रदेशमधील एका ७० वर्षीय पर्यटकाला बुडताना वाचवले.