Goa: विहीरीत पडलेल्या ऑस्ट्रेलियन नागरिकाला जीवनदान
By काशिराम म्हांबरे | Published: December 5, 2023 11:46 AM2023-12-05T11:46:19+5:302023-12-05T11:46:56+5:30
Goa News: वागातोर येथे मंगळवारी भल्या पहाटे ४ च्या दरम्यान विहिरीत चुकून पडलेल्या फ्लेमिंग डेनियल लुके ( वय २९ ) या आॅस्ट्रेलियन देशातील नागरिकाला येथील अग्नीशमन दलाच्या जवानांकडून जीवदान देण्यात आले. अंदाजीत ४५ फूट खोल विहीरीत तो पडला होता.
- काशिराम म्हांबरे
म्हापसा - वागातोर येथे मंगळवारी भल्या पहाटे ४ च्या दरम्यान विहिरीत चुकून पडलेल्या फ्लेमिंग डेनियल लुके ( वय २९ ) या ऑस्ट्रेलियन देशातील नागरिकाला येथील अग्नीशमन दलाच्या जवानांकडून जीवदान देण्यात आले. अंदाजीत ४५ फूट खोल विहीरीत तो पडला होता.
एक व्यक्ती वागातोर परिसरातील विहीरीत पडल्याची माहिती उपलब्ध होताच दलाचे जवान तातडीने घटना स्थळी दाखल झाले. पहाटेच्या अंधारात अत्यंत खोल असलेल्या विहीरीत उतरणे धोकादायक असूनही दलाचे जवान प्रवीण नाईक यांनी त्याची पर्वा न करता इतर जवानांच्या सहकार्याने विहीरीत उतरण्याचे धाडस करुन त्याला सुखरूपपणे बाहेर काढण्यास यश मिळवले.
ज्या भागात ही घटना घडली तेथून फ्लेमिंग लुकेजात असताना तेथेच असलेल्या विहीरीचा अंदाज त्याला आला नाही. त्यामुळे तोल जाऊन तो आत पडला. विहीरीतील पाण्याची पातळी जास्त असल्याने लुके याला जास्त दुखापत झाली नाही. घटनेनंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दलाच्या पथकातील इतर जवानांनी या कार्यात अत्यंत मोलाची भुमीका बजावली.