बी. एल. संतोष आमदारांच्या बैठकीत घेणार निवडणूक तयारीचा आढावा, सदानंद तानावडे यांची माहिती
By किशोर कुबल | Updated: April 25, 2024 14:22 IST2024-04-25T14:20:51+5:302024-04-25T14:22:32+5:30
Goa Lok Sabha Election 2024: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल्. संतोष (B. L. Santosh) दोन्ही लोकसभा मतदारसंघातील आमदारांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. दोन्ही जागा जिंकण्यासाठी आमदारांना टार्गेट देण्यात आलेले आहे.

बी. एल. संतोष आमदारांच्या बैठकीत घेणार निवडणूक तयारीचा आढावा, सदानंद तानावडे यांची माहिती
- किशोर कुबल
पणजी - भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल्. संतोष दोन्ही लोकसभा मतदारसंघातील आमदारांच्या बैठका घेऊन निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहेत. दोन्ही जागा जिंकण्यासाठी आमदारांना टार्गेट देण्यात आलेले आहे. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी यास दुजोरा दिला. ते म्हणाले की, ‘ आम्ही निवडणुकीसाठी पूर्ण तयारीने सज्ज आहोत. आढावा घेण्यासाठी ही बैठक लवकरच होणार आहे.’
शहा यांची सभा १ ते ३ मे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची म्हापशातील २४ रोजीची पुढे ढकललेली जाहीर सभा आता १ ते ३ मे या दरम्यान होईल, असे तानावडे यांनी सांगितले. सांकवाळ येथे येत्या २७ रोजी होणार असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी जोरात सुरु आहे.
दरम्यान, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी राज्य घटनेचा अनादर करणाय्रा केलेल्या कथित विधानाचे समर्थन करुन तानावडे यांच्यावर केलेल्या शरसंधानाचा तानावडे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की,‘पाटकर यानी मला घटनेविषयी शिकवू नये. त्यानी आधी कॉंग्रेस पक्षात जे अंतर्गत राजकारण चालले आहे त्याकडे लक्ष द्यावे.