Goa: मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेत तळ, दिगंबर कामत यांच्यासह मोती डोंगराला दिली भेट
By किशोर कुबल | Published: May 7, 2024 01:57 PM2024-05-07T13:57:06+5:302024-05-07T13:59:26+5:30
Goa Lok Sabha Election 2024: भाजपने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघापेक्षा दक्षिण गोव्यातील लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी मतदान केल्यानंतर थेट दक्षिणेत तळ ठोकला.
- किशोर कुबल
पणजी - भाजपने उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघापेक्षा दक्षिण गोव्यातील लढत प्रतिष्ठेची बनवली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सकाळी मतदान केल्यानंतर थेट दक्षिणेत तळ ठोकला.
मडगावला स्थानिक आमदार दिगंबर कामत यांच्यासह त्यांनी मोती डोंगर येथे भेट दिली व तेथील मतदानाच्या स्थितीचा आढावा घेतला. दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपने यावेळी प्रथमच पल्लवी धेंपे यांच्या रूपाने महिला उमेदवार दिलेला आहे. त्यांना निवडून आणण्याचे मोठे आव्हान भाजप समोर आहे. दक्षिण गोव्यात दुपारी १२ वाजेपर्यंत ३१.५६ टक्के मतदान झाले होते. अधिकाधिक मतदानांना घराबाहेर काढून मतदान वाढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
लोकमतच्या या प्रतिनिधीने मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघात भाजप उमेदवार पल्लवी धेंपे यांना मताधिक्य
मिळेल. मुख्यमंत्री मडगावात तीन ते चार बुथांवर फिरले तसेच पल्लवी यांनीही तीन-चार बुथांवर भेट दिली आहे. संध्याकाळी केंद्रीय नेते सुरेश प्रभू मडगावमध्ये येणार आहेत.
दक्षिण गोवा मतदारसंघ
(दुपारी बारा वाजेपर्यंत मतदान)
फोंडा. ३२.४९
शिरोडा. ३१.९५
मडकई. २९.१४
मुरगाव. २८.१५
वास्को २९.१४
दाबोळी ३०.६६
कुठ्ठाळी. ३१.३३
नुवें ३१.४३
कुडतरी ३१.३३
फातोर्डा. ३२
मडगांव ३१.४४
बाणावली. २९.२०
नावेली. ३०.३२
कुंकळ्ळी. ३३.१९
वेळ्ळी. ३१.१५
केपें. ३३.४७
कुडचडें. ३४.७७
सावर्डे. २९.९२
सांगे. ३४.२८
काणकोण ३३.९३