पैसे घेऊन फिरणारे यंत्रणांच्या रडारवर! ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम आढळल्यास कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2024 08:08 AM2024-03-19T08:08:31+5:302024-03-19T08:08:44+5:30

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी : २४ भरारी पथके स्थापन

goa lok sabha election 2024 on the radar of those who move with money action if found more than 50 thousand | पैसे घेऊन फिरणारे यंत्रणांच्या रडारवर! ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम आढळल्यास कारवाई 

पैसे घेऊन फिरणारे यंत्रणांच्या रडारवर! ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम आढळल्यास कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगावः राज्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणूक काळात एखादा व्यक्ती कागदपत्रांशिवाय ५० हजाराहून अधिक रोख रक्कम घेऊन फिरताना आढळल्यास ती तत्काळ जप्त करण्यात येईल, अशी माहिती दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अश्विन चंदू ए यांनी दिली. काल, सोमवारी मडगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी म्हणाले, दक्षिण गोवा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सक्रिय केली आहे. रोख रक्कम घेऊन फिरणान्या लोकांची झडती घेण्यासाठी २५ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तसेच बँकांनाही संशयास्पद व्यवहाराबद्दल अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मतदानासाठी विविध अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. मतदानासाठी मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. 

निवडणुकीसंदर्भात विविध अधिकाऱ्यांच्या तसेच विविध राजकीय पक्षांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. एकूण ८६५ मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रॅम्प व्हीलचेअर तसेच हेल्प डेस्कची सुविधा असेल, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. निवडणूक काळात कोणालाही गैरप्रकार दिसून आल्यास तत्काळ १९५० या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले.

स्थापन केलेली भरारी पथके रेल्वे स्थानकासह काही मोक्याच्या ठिकाणी पाहणी करतील. तसेच कुठेही गैरप्रकार होत असल्यास नागरिकांनी तक्रार करायी. भरारी पथक तातडीने घटनास्थळी पोहोचून कारवाई करेल. ५० हजारपेक्षा अधिक रक्कम घेऊन जाताना जर कोणी आढळल्यास त्याची चौकशी करण्यात येईल. यावेळी त्याच्या जवळ असणारी रक्कम कुठून आणली, याची वैध कागदपत्रे असणे आवश्यक आहे. अन्यथा ती रक्कम जप्त करण्यात येईल.

नियंत्रण कक्ष सुरू

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत असेल. निवडणुकीशी संबंधित कोणतीही तक्रार खाली नमूद केलेल्या ०८३२२२२५३८३ लैंडलाइन आणि ९६९९७९३४६४ मोबाईल आणि व्हॉट्सअॅपवर नोंदविता येईल, तसेच १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यरत असेल असे माहिती खात्वाने कळवले आहे.

२४ तास पहारा

३ लाख ६ हजार ८८० महिला दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्याच्या सीमेवरील तपासणी नाक्यावर २४ तास पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गैरप्रकार दिसल्यास अॅपवर तक्रार करा

निवडणूक काळात उत्तर गोव्यात कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. पैसा व सत्तेचा वापर होऊ नये यासाठी २३ भरारी पथके व १६ देखरेख पथकांची स्थापना केली आहे. तसेच तक्रारीसाठी अॅपचा वापर लोकांनी करावा, असे आवाहन उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गिते यांनी केले.

पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सोबत उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर गोव्यात ८६३ पोलिंग स्टेशन असून यात २० पिंक स्टेशन, ४३ मॉडेल स्टेशनचा समावेश आहे, याशिवाय निवडणुकीसाठी खास दिव्यांग मतदारांसाठी पाच पोलिंग स्टेशन व ४० ग्रीन पोलिंग स्टेशनचा समावेश असेल त्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक अक्षत कौशल म्हणाले, उत्तर गोव्याला सहाचेक पोस्ट लागतात. त्यानुसार कर्नाटक येथील बेळगाव व महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथील अधिकाऱ्यांसोबत आम्ही समन्वय साधून आहे.

चेकपोस्टवर सीसीटीव्ही कॅमऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जात आहे. तसेच 'सीआरपीएफ'ची एक तुकडी उत्तर गोव्यात दाखल झाली असून ते नियमितपणे गस्त घालत आहेत.

... तर तडीपार करू

उत्तर गोव्यातील सराईत गुन्हेगारांची यादी प्रत्येक पोलिस ठाणे तयार करत जात आहे. जर यापैकी कुणी निवडणुकीवेळी अडथळा निर्माण करतील, असे वाटत असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे त्याला तडीपार करण्याची शिफारस केली जाऊ शकते, असे अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले.

मतदान केंद्रांत बदल नाही

पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरू असल्याने रस्ते खोदण्यात आले आहेत. असे असले तरी मतदान केंद्रांमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. पूर्वी ज्या ठिकाणी मतदान केंटे होती ती तिथे असतील, अशी माहिती जिल्हाधिकारी गिते यांनी दिली.

 

Web Title: goa lok sabha election 2024 on the radar of those who move with money action if found more than 50 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.