Goa Lok Sabha Election 2024: सासष्टीतील एसटींची मते कुणाच्या पारड्यात पडणार? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2024 08:26 AM2024-03-22T08:26:54+5:302024-03-22T08:27:49+5:30

Goa Lok Sabha Election 2024: भाजप, काँग्रेस व आरजीचे मतदारांच्या भूमिकेवर लक्ष

goa lok sabha election 2024 whose party will the votes of st in sasashti | Goa Lok Sabha Election 2024: सासष्टीतील एसटींची मते कुणाच्या पारड्यात पडणार? 

Goa Lok Sabha Election 2024: सासष्टीतील एसटींची मते कुणाच्या पारड्यात पडणार? 

लोकमत न्यूज नेटवर्क सासष्टी : सासष्टी तालुक्यात खिस्ती व हिंदू समाजातील अनेक एसटी बांधव राहतात. कुडतरी, नुवे, वेळ्ळी, दिगंबर कामत बाणावली, फातोर्डा अशा काही मतदारसंघांमध्ये एसटी मतदारांची संख्या कमी नाही. पाच मतदारसंघांतील काही पंचायत क्षेत्रांमध्ये तर एसटींचेच प्राबल्य आहे. ही मते यावेळच्या लोकसभा निवडणुकीवेळी कोण मिळवील, ते पाहावे लागेल.

भाजप, काँग्रेस व आरजी या तीनही पक्षांचे या मतांवर विशेष लक्ष आहे. आरजीने दिलेला उमेदवार हा सासष्टीतील आहे. तो एसटी समाजातील आहे. मात्र, त्या उमेदवारापासून आपल्या मतांना धोका नाही, असे भाजपच्या विविध नेत्यांना वाटते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सासष्टीसह दक्षिण गोव्यात आपले दौरे वाढवले आहेत. कुंकळ्ळी, मडगाव हे मतदारसंघही सासष्टीत येतात. वेळ्ळी व बाणावली हे दोन मतदारसंघ यावेळी प्रथमच आम आदमी पक्षाकडे आहेत आणि आपचा काँग्रेससोबत निवडणूक समझोता झालेला आहे.

कुंकळ्ळी काँग्रेसकडेच आहे, तर फातोर्डा हा विजय सरदेसाई (गोवा फॉरवर्ड) यांच्याकडे आहे. मडगाव मात्र भाजपकडे आहे. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड हे अपक्ष असले तरी ते भाजप सरकराचा भाग आहेत. नुवे मतदारसंघ भाजपकडे आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी नुवे हा काँग्रेसकडे होता. मडगावदेखील काँग्रेस पक्षाकडे होता.

मडगाव मतदारसंघात सारस्वतांबरोबरच भंडारी समाजातील मतेही बऱ्यापैकी आहेत. सासष्टीतील एसटी समाजाची मते आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष धडपडतीलच. भाजपने एसटींना विधानसभेत आरक्षण देण्याचा विषय केंद्र सरकारपर्यंत पोहोचवला. काही जणांना हे भाजपचे कागदोपत्री गाजर असे वाटते तर काही जणांना २०२७ साली एसटींना राजकीय आरक्षण मिळेलच, असे वाटते. काँग्रेस पक्षाशी संबंधित काही एसटी बांधव मात्र अधूनमधून आंदोलन करत आहेत.

गेल्या निवडणुकीवेळी काही प्रमाणात ही मते काँग्रेसने मिळवली होती. यावेळी नुवेतील व कुडतरीतील एसटींची मते भाजपकडे वळवण्यात अनुक्रमे मंत्री आलेक्स सिक्वेरा व आमदार रेजिनाल्ड यांना यश येईल का पाहावे लागेल.

कष्ट घ्यावेच लागणार

भाजप व काँग्रेस पक्ष उमेदवार कोणत्या प्रकारचा देतो, ते पाहिल्यानंतरच एसटी बांधव निवडणुकीवेळी काय करतील, ते कळून येईल. गावडा, कुणबी या समाजातील सासष्टीतील मते मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना खूप कष्ट घ्यावे लागतील

 

Web Title: goa lok sabha election 2024 whose party will the votes of st in sasashti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.