मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात पहिल्या दोन तासात सर्वाधिक १७ टक्के मतदान
By किशोर कुबल | Published: May 7, 2024 10:29 AM2024-05-07T10:29:52+5:302024-05-07T10:30:25+5:30
लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात गोव्यात मतदानाला सुरुवात झाली आहे.
पणजी : लोकसभेसाठी उत्तर गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळी विधानसभा मतदारसंघात ९ वाजेपर्यंत सर्वाधिक १७ टक्के मतदान झाले आहे. तर वाळपई मतदारसंघात १३.५६ टक्के मतदान झालेले आहे.
लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात गोव्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. ११,७९,६४४ मतदार गोव्यातील दोन लोकसभा मतदारसंघांसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, उत्तर आणि दक्षिण गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार ॲड रमाकांत खलप आणि कॅप्टन विरिएटो फर्नांडिस, आरजीपीचे उमेदवार मनोज परब, बसपा उमेदवार डॉ. स्वेता गावकर आणि इतरांनी सकाळीच मतदान केले.