'लोकमत' खऱ्या अर्थाने बनले लोकांचे मत: केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 08:29 AM2023-11-12T08:29:05+5:302023-11-12T08:29:57+5:30
गोवा आवृत्तीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'लोकमत खया अथनि लोकांचे मत बनले आहे' असे उद्गार केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी काढले. लोकमतच्या गोवा आवृत्तीच्या दिवाळी अंकाचे काल शनिवारी प्रकाशन झाले. त्यानिमित्तच्या सोहळ्यात नाईक बोलत होते.
श्रीपाद नाईक आणि राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला. 'लोकमत'च्या पाटो-पणजी कार्यालयात छोटेखानी सोहळा झाला. केंद्रीय मंत्री नाईक म्हणाले की, 'लोकमतच्या दिवाळी अंकाची अनेक जण वाट पहातात. त्याचे प्रकाशन करताना आम्हाला फार आनंद होत आहे.
लोकमतने राज्यातील नागरिकांच्या मनात स्वतःचे भक्कम असे स्थान निर्माण केले आहे. केवळ एका बाजूचीच बातमी न देता बातमीला समान न्याय देण्याचे काम लोकमत करीत आहे. त्यामुळे हे वृत्तपत्र हे खऱ्या अर्थाने लोकांचे मत बनले आहे. लोकमत वर्तमानपत्र हे सर्व घटकांना समावून घेऊ बातमी देत आहे. म्हणून गोमंतकीयांना लोकमत खुप आवडतो. दरम्यान, निवासी संपादक सदगुरु पाटील यांनी प्रास्ताविक केले तर वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते यांनी आभार मानले.
'कुजबूज'चा विशेष उल्लेख
खासदार सदानंद शेट तानावडे म्हणाले की, लोकमतने कष्टाने विश्वासार्हता कमावली आहे. गेल्या दोन वर्षात तर लोकमतची अधिक वाढ झाली. हे दैनिक समतोल झाले. सर्वांना समान स्थान देणारे झाले. राजकीय बातम्यांचे अचूक विश्लेषण लोकमत करते. एका बाजूनेच बातमी देणे, दुसन्याची बाजू न देणे असे होत नाही. अनेकजण खास कुजबूज वाचण्यासाठीच लोकमत प्रथम हातात घेतात. कुजबूज वाचायला सगळेच फार उत्सुक असतात. काही अंतर्गत राजकीय माहिती जी आम्हाला देखील अनेकदा कळत नाही. ती लोकमतला कळते व मग आम्हाला कुजबूजमधून ती वाचायला मिळते.