Goa Municipal Election 2021: गोव्यात पालिका निवडणुकीत भाजपला यश, पण मुख्यमंत्र्यांचा उमेदवार हरला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 11:23 AM2021-03-22T11:23:35+5:302021-03-22T11:26:01+5:30

पणजी महापालिका निवडणुकीत तीसपैकी पंचवीस जागा भाजप पुरस्कृत उमेदवारांनी जिंकल्या आहेत. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली नसली तरी भाजपने पॅनल पुरस्कृत केले होते. (Goa Municipal corporation Election 2021 result)

Goa Municipal Election 2021: BJP wins municipal elections in Goa, but loses CM candidate | Goa Municipal Election 2021: गोव्यात पालिका निवडणुकीत भाजपला यश, पण मुख्यमंत्र्यांचा उमेदवार हरला

Goa Municipal Election 2021: गोव्यात पालिका निवडणुकीत भाजपला यश, पण मुख्यमंत्र्यांचा उमेदवार हरला

googlenewsNext

पणजी : गोव्यातील सहा नगरपालिका आणि पणजी महापालिका यासाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल सोमवारी जाहीर झाले. भारतीय जनता पक्षाने पुरस्कृत केलेले उमेदवार बहुतेक ठिकाणी जिंकले आहेत. मात्र मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या साखळी मतदारसंघातील साखळी पालिकेच्या एका प्रभागातील पोटनिवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. (Goa Municipal Election 2021: BJP wins municipal elections in Goa, but loses CM candidate)

या निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले होते. लाखभर मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. सोमवारी मतमोजणी पार पडली. पणजी महापालिका निवडणुकीत तीसपैकी पंचवीस जागा भाजप पुरस्कृत उमेदवारांनी जिंकल्या आहेत. पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली नसली तरी भाजपने पॅनल पुरस्कृत केले होते.

वाळपई व डिचोली या दोन्ही नगरपालिकांच्या ठिकाणी भाजपला मोठे यश मिळाले आहे. काणकोण नगरपालिकेतही भाजप पुरस्कृत बहुतेक उमेदवार जिंकले आहेत. पेडणे ही पालिका उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या समर्थकांच्या ताब्यात होती पण तेथे भाजपला मोठे यश मिळाले नाही. कुंकळ्ळी पालिकेच्या निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार पराभूत झाले आहेत.

साखळी हा मुख्यमंत्री सावंत यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. तिथे साखळी या एकमेव पालिकेच्या एकाच प्रभागात पोटनिवडणूक होती. ती जागा जिंकावी म्हणून मुख्यमंत्री सावंत यांनी खूप प्रयत्न केले पण त्यांचा उमेदवार अठरा मतांनी पराभूत झाला. हा भाजपसाठी व मुख्यमंत्री सावंत यांच्या साठीही मोठा धक्का मानला जात आहे.

कुंकळी पालिकेत 13 प्रभागांपैकी 11 प्रभागांचे निकाल जाहीर -
कुंकळी पालिकेत 13 प्रभागांपैकी 11 प्रभागांचे निकाल जाहीर झाले असून 5 काँग्रेस समर्थक, 4 भाजप समर्थक तर 2 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग 4 मधून काँग्रेसचे समर्थन मिळालेल्या रुपा गावकर केवळ 1 मताने विजयी. आमदार समर्थक उमेदवार जॉर्जिना गामा यांचा प्रभाग 1 मधून पराभव झाला. तर उपनागराध्यक्ष वीरेंद्र देसाई विजयी झाले आहेत.

गोव्याच्या पालिका क्षेत्रात आपने खाते उघडले -
कुडचडे काकोडा पालिकेच्या प्रभाग 3 मधून आप पुरस्कृत उमेदवार क्लेमेंतीना फेर्नांडिस विजयी. गोव्याच्या पालिका क्षेत्रात आपने खाते उघडले. 

कुडचडे काकोडा पालिकेच्या 15 पैकी 9 प्रभागांचे निकाल जाहीर -
कुडचडे काकोडा पालिकेच्या 15 पैकी 9 प्रभागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यांत 7 भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी. 1 भाजप बंडखोर तर 1 आप पुरस्कृत उमेदवार विजयी झाला आहे. स्थानिक आमदार व वीज मंत्री निलेश काब्राल यांचे समर्थक असलेले माजी नगराध्यक्ष फेलिक्स फेर्नांडिस यांचा भाजप बंडखोर दामोदर भेंडे यांच्याकडून पराभव झाला.

Web Title: Goa Municipal Election 2021: BJP wins municipal elections in Goa, but loses CM candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.