Goa: मुरगावचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांचा राजीनामा, पुढील उपनगराध्यक्ष म्हणून ही नावं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 04:44 PM2023-04-05T16:44:50+5:302023-04-05T16:45:10+5:30

Goa News: दक्षिण गोव्यातील मुरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांनी त्याच्या पदाचा राजीनामा मंगळवारी (दि.४) पालिका संचालक कार्यालयात सुपूर्द केला आहे.

Goa: Murgaon sub-president Amey Chopdekar resigns, these names are being discussed as the next sub-president | Goa: मुरगावचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांचा राजीनामा, पुढील उपनगराध्यक्ष म्हणून ही नावं चर्चेत

Goa: मुरगावचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांचा राजीनामा, पुढील उपनगराध्यक्ष म्हणून ही नावं चर्चेत

googlenewsNext

- पंकज शेट्ये 
वास्को: दक्षिण गोव्यातील मुरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांनी त्याच्या पदाचा राजीनामा मंगळवारी (दि.४) पालिका संचालक कार्यालयात सुपूर्द केला आहे. सात दिवसांच्या आत अमेय चोपडेकर यांनी राजीनामा मागे घेतला नसल्यास मुरगावचा नवीन उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी पालिका संचालक कार्यालयातर्फे तारीख निश्चित करण्यात येईल. मुरगाव नगरपालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकात झालेल्या अलिखीत करारानुसार अमेय चोपडेकर यांना उपनगराध्यक्ष बनून एक वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याची माहीती सूत्रांनी दिली.

मुरगावचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने आता नवीन उपनगराध्यक्ष कोण बनणार अशी चर्चा व्हायला सुरू झाली आहे. ३० मार्च २०२२ रोजी अमेय चोपडेकर यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर त्यांनी पदाचा ताबा घेतला होता. मुरगाव नगरपालिकेतील सत्ताधारी - भाजप नगरसेवकात झालेल्या अलिखीत करारानुसार अमेय चोपडेकर यांचा उपनगराध्यक्ष बनून एक वर्षाचा काळ पूर्ण झाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा देणारे पत्र पालिका संचालक कार्यालयात सुपूर्द केले आहे. सात दिवसात चोपडेकर यांनी राजीनामा मागे घेतला नसल्यास नंतर पालिका संचालक मुरगाव नगरपालिकेचा नवीन उपनगराध्यक्ष निवडण्यासाठी उचित पावले उचलणार आहेत.

अमेय चोपडेकर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने भविष्यात मुरगाव नगरपालिकेचा नवीन उपनगराध्यक्ष कोण बनणार अशी चर्चा व्हायला सुरू झाली आहे. मुरगाव नगरपालिकेच्या सत्ताधारी गटातील नगरसेवक विनोद कीनळेकर मुरगावचे पुढचे उपनगराध्यक्ष बनणार अशी पूर्वी चर्चा व्हायची. मात्र अमेय चोपडेकर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नगरसेवक रामचंद्र कामत पुढचे उपनगराध्यक्ष बनणार अशी चर्चा व्हायला सुरू झाली आहे. भविष्यात मुरगावचा उपनगराध्यक्ष कोण बनणार ते उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतरच स्पष्ट होणार असलेतरी रामचंद्र कामत अथवा विनोद कीनळेकर यांच्यापैंकी एकाच्या गळ््यात उपनगराध्यक्ष पदाची माळ पडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

Web Title: Goa: Murgaon sub-president Amey Chopdekar resigns, these names are being discussed as the next sub-president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा