Goa: अमली पदार्थांच्या व्यवहारातून स्टॅन्ली दांपत्याने कमावलेली कोट्यावधी रुपयांची मालमत्ता NCBकडून जप्त
By पूजा प्रभूगावकर | Published: April 12, 2024 01:34 PM2024-04-12T13:34:59+5:302024-04-12T13:35:28+5:30
Goa Crime News: नार्कोटीक कंट्राेल ब्युरो (एनसीबी)च्या गोवा विभागाते नायजेरियन अमलपीदार्थ विक्रेता इवुआला उडोका स्टॅन्ली याला अटक केली. तसेच स्टॅन्ली,त्याची पत्नी सिमरन उर्फ उषा चंदेल यांनी अमलीपदार्थांची विक्री करुन विकत घेतलेली १.०६ कोटी रुपयांची मालमत्ता जमा केली.
- पूजा नाईक प्रभूगावकर
पणजी - नार्कोटीक कंट्राेल ब्युरो (एनसीबी)च्या गोवा विभागाते नायजेरियन अमलपीदार्थ विक्रेता इवुआला उडोका स्टॅन्ली याला अटक केली. तसेच स्टॅन्ली,त्याची पत्नी सिमरन उर्फ उषा चंदेल यांनी अमलीपदार्थांची विक्री करुन विकत घेतलेली १.०६ कोटी रुपयांची मालमत्ता जमा केली.
एनसीबीने प्राप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे. या प्रकरणी स्टॅन्ली , उषा यांच्यासह राजू साळगावकर व मायकल फर्नांडिस यांनाही अटक केली आहे. कांदोळी येथील स्टॅन्ली हा अमलीपदार्थांची विक्री करीत तर त्याबाबतचा सर्व आर्थिक व्यवहार हा त्याची पत्नी उषा ही पहात असे. त्यातून त्यांनी कोटयावधी रुपयांची मालमत्ताही खरेदी केली होती, अशी माहिती एनसीबीच्या तपासात समोर आली आहे.
स्टॅनली याला यापूर्वी तेलंगणा पोलिसांनी अटक केली असता त्याच्याकडून ८ कोटी रुपयांचा अमलीपदार्थ जप्त केला होता. या प्रकरणाशी संबंधीत तपासा वेळी उषा हिची कसून चौकशी एनसीबी ने केली असताना तिच्या बॅंक खात्यात गेल्या एका वर्षात ४०.२० लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याचे व २६.९० लाख रुपये काढल्याचे आढळून आले आहे. एनसीबीने स्टॅन्लीला उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाकडून ट्रान्झिट रिमांडवर बुधवारी गोव्यात अटक करुन आणले.