गोव्यात उच्च सुरक्षा क्रमांकपट्टीसाठी येणाऱ्या चालकांचे हाल सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 08:53 PM2019-10-31T20:53:51+5:302019-10-31T20:55:45+5:30

उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी लावून घेण्यासाठी येणा-या वाहन चालकांचे हाल अजूनही कमी झाले नसून गुरुवारी त्यामुळे लोकांच्या संतापाला हे काम करणाऱ्या कंत्रटदाराला सामोरे जावे लागले.

Goa news | गोव्यात उच्च सुरक्षा क्रमांकपट्टीसाठी येणाऱ्या चालकांचे हाल सुरूच

गोव्यात उच्च सुरक्षा क्रमांकपट्टीसाठी येणाऱ्या चालकांचे हाल सुरूच

Next

मडगाव - उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी लावून घेण्यासाठी येणा-या वाहन चालकांचे हाल अजूनही कमी झाले नसून गुरुवारी त्यामुळे लोकांच्या संतापाला हे काम करणाऱ्या कंत्रटदाराला सामोरे जावे लागले. फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी हस्तक्षेप केल्यानंतर शेवटी जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना एकतर लोकांसाठी पुरेशी सोय करा किंवा तोपर्यंत काम बंद ठेवा, अशा सूचना केल्या. उद्यार्पयत रांगेत उभे रहाणा-या लोकांसाठी मंटप उभारला नाही आणि लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली नाही तर हे काम बंद पाडू असा इशारा सरदेसाई यांनी दिला.

जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी आरटीओचे सहाय्यक संचालक विनोद आर्लेकर व प्रकाश खोलकर या दोघांना आपल्या कार्यालयात बोलावून घेऊन लोकांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच उच्च सुरक्षा पट्टी म्हणजे नेमके काय आणि ती बसविण्याची पद्धत कशी त्याची माहिती देणारे फलकही लावण्याच्या सुचना केल्या. त्यापूर्वी विजय सरदेसाई यांनी या कामासाठी किमान दहा काऊन्टर सुरू करावेत त्यापैकी दोन काऊन्टर महिला, ज्येष्ठ नागरीक आणि विशेष क्षमतेच्या लोकांसाठी राखीव असावेत. एवढेच नव्हे तर लोकांना उन्हाचा त्रस होऊ नये यासाठी मंटप उभारण्याबरोबरच लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी केली. अन्यथा शुक्रवारपासुन हे काम बंद पाडण्यात येईल असा इशारा दिला. कंत्रटदाराची दादागिरी चालू राहिल्यास लोक रस्त्यावर येतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.    

गुरुवारी क्रमांकपट्टी बदलून घेण्यासाठी आरटीओच्या आर्लेम कार्यालयाच्या आवारात लोकांची लांबच लांब रांग लागल्याचे कळून आल्यानंतर विजय सरदेसाई यांनी आपल्या कार्यकत्र्यासह या जागेला भेट दिली. या रांगेत सासष्टी बरोबरच  केपेतील ग्राहकही उभे होते. सुमारे 300—400 लोक क्रमांकपट्टय़ा बदलून घेण्यासाठी आले असताना हे काम करण्यासाठी केवळ एकच माणूस ठेवण्यात आला होता असे दिसून आले. त्यामुळे तिथे सगळाच अनागोंदी कारभार चालू असल्याचे दिसून आले. केवळ एकाच काऊन्टरवर काम चालू असल्याने लोकांना तासन्तास तिश्ठत रांगेत उभे रहावे लागल्याने लोकांमध्येही संतापाचे वातावरण पसरले होते. अशातच या ठिकाणी बसविण्यात येत असलेल्या  क्रमांकपट्टय़ा योग्यरित्या बसविण्यात येत नसल्याचे दिसून आल्यानंतर लोकांमधील संताप अधिकच वाढला.

या क्रमांकपट्टय़ा बसविणा-या कंपनीच्या कंत्रटदाराला अटक करा अशी मागणी करण्यात आली. यावेळी कायदा व सुव्यवस्था हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने सासष्टीचे मामलेदार प्रताप गावकर यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिका:यांनी आपल्या कार्यालयात कंत्रटदार व आरटीओ अधिका-यांची बैठक घेतली असता मंटप उभारणो आणि पिण्याच्या पाण्याची सोय करणो आपल्या कंत्रटात येत नाही अशी भूमिका कंत्रटदाराने घेतल्यानंतर तसे तर या सुविधा आरटीओने उपलब्ध करुन द्याव्यात अशी सुचना जिल्हाधिका-यांनी केली.

क्रमांकपट्टीच अयोग्य?
उच्च सुरक्षेच्या नावाखाली जी क्रमांकपट्टी बदलून दिली जाते ती कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे का असा सवाल सध्या निर्माण झाला आहे. सध्या जी नवीन क्रमांकपट्टी दिली जाते त्यात सहा डिजीट वर व सहा डिजीट खाली अशारितीने तयार केली जाते. ही एकदम अयोग्य पद्धत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अतिरिक्त संचालक आर्लेकर यांनीही कायदेशीरदृष्ट्या ही क्रमांकपट्टी अयोग्य असल्याचे सांगितले व अशा क्रमाकांच्या वाहनांना दंडही होऊ शकतो असे सांगितले. जर अयोग्य क्रमांकपट्ट्या बसविल्या जात आहेत तर आरटीओ त्या कशा बसवायला देते, असा सवाल आर्लेकर यांना केला असता, क्रमांक नोंदणीचे काम आपले सहकारी प्रकाश खोलकर पहातात असा खुलासा त्यांनी केला.

हा तर घोटाळा— सरदेसाई
उच्च क्रमांकपट्टी बसविण्यासाठी दिलेले कंत्रट हा एक घोटाळा असल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी केला. ते म्हणाले, सरकारातील कुणीतरी पैसे खावून हे कंत्रट दिले आहे त्यामुळेच उत्तर प्रदेशातील हा कंत्रटदार गोव्यातील लोकांना रांगेत ठेवून वेठीस धरतो. मात्र त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई होत नाही. या पट्टय़ा रिबिटने बसविणो आवश्यक असताना त्या स्क्रू वापरुन बसविल्या जातात. त्यामुळे यात सुरक्षा कुठली असा सवाल सरदेसाई यांनी केला. हे काम कुठलाही गोमंतकीय कंत्रटदार करु शकला असता. असे असताना उत्तर प्रदेशचा कंत्रटदार का शोधला गेला. सरकार जे गोंयकारपण म्हणते ते हेच का? असा सवाल त्यांनी केला.

Web Title: Goa news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा