गोवा - सहा महिन्यांत स्पीड गवर्नर लावा, पर्यटक टॅक्सींसाठी अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 05:58 PM2018-01-25T17:58:08+5:302018-01-25T17:59:06+5:30

राज्यातील पर्यटक टॅक्सींना स्पीड गवर्नर लावण्यापासून सरकारने मुळीच मोकळीक दिलेली नाही. फक्त येत्या दि. 31 जुलैर्पयत सहा महिन्यांची मुदत दिली आहे. याविषयीची अधिसूचना वाहतूक खात्याने गुरुवारी जाहीर केली.

Goa - notification issued for tourist taxis to install speed ​​governor | गोवा - सहा महिन्यांत स्पीड गवर्नर लावा, पर्यटक टॅक्सींसाठी अधिसूचना जारी

गोवा - सहा महिन्यांत स्पीड गवर्नर लावा, पर्यटक टॅक्सींसाठी अधिसूचना जारी

googlenewsNext

पणजी : राज्यातील पर्यटक टॅक्सींना स्पीड गवर्नर लावण्यापासून सरकारने मुळीच मोकळीक दिलेली नाही. फक्त येत्या दि. 31 जुलैर्पयत सहा महिन्यांची मुदत दिली आहे. याविषयीची अधिसूचना वाहतूक खात्याने गुरुवारी जाहीर केली.
पर्यटक टॅक्सींबाबत गोमंतकीयांच्या भावना तीव्र आहेत. जास्त प्रमाणात भाडे आकारले जात असल्याने पर्यटकांसह लोकही टॅक्सी व्यवसायिकांवर नाराज आहेत. सरकारला याची कल्पना असल्याने टॅक्सी व्यवसायिकांना स्पीड गवर्नरसाठी फक्त सहा महिन्यांची मुदत द्यावी असे ठरले. या सहा महिन्यांच्या आत जर राज्यात पुरेसे स्पीड गवर्नर उपलब्ध झाले किंवा डिलरांची संख्या वाढली तर, अगोदरच टॅक्सींना स्पीड गवर्नर लावावे लागतील, असे वाहतूक खात्याच्या अधिसूचनेत म्हटले आहे. ज्या वाहनांना चार चाके आहेत, ज्यांचे एकूण वजन 3 हजार 5क्क् पेक्षा जास्त किलो होत नाही आणि ज्यांचा वापर प्रवाशांची आणि प्रवाशांच्या सामानाची वाहतूक करण्यासाठी होतो, अशा वाहनांना 31 जुलै 2क्18 र्पयतच स्पीड गवर्नर लावण्यापासून सवलत दिली जात असल्याचे अधिसूचनेत संचालक निखिल देसाई यांनी म्हटले आहे. केंद्रीय मोटर वाहन कायद्याच्या 118 नियमानुसार स्पीड गवर्नर सार्वजनिक वाहतूक करणा:या वाहनांसाठी बंधनकारक आहे. मात्र पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांनी यापूर्वी आंदोलन केल्यामुळे आणि त्यांनी स्पीड गवर्नरला पूर्ण विरोधाची भूमिका घेतल्यामुळे सरकारने सहा महिन्यांची सवलत दिली. पर्यटक टॅक्सींची स्पीड गवर्नरपासून सुटका व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात वगैरे जाण्याचा सरकारचा मुळीच विचार नाही, असे एका अधिका:याने सांगितले. 
पर्यटक टॅक्सींची संख्या गोव्यात सुमारे वीस हजार आहे. यापूर्वी अन्य प्रकारच्या सुमारे साडेचार हजार टॅक्सींनी स्पीड गवर्नर लावले आहेत. स्पीड गवर्नर लावले तर आपल्याला प्रति किलोमीटर ताशी 8क् पेक्षा जास्त वेगाने वाहन चालविता येणार नाही असे पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांचे म्हणणो आहे. स्पीड गवर्नर लावणो आपल्यासाठी रद्दच करावा अशी त्यांची मागणी आहे. मात्र अन्य राज्यांतील पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांनी जर स्पीड गवर्नर स्वीकारलेला असेल तर गोव्यातीलच व्यवसायिक आक्षेप का घेत आहेत असा प्रश्न यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनीही विचारला आहे. गेल्या आठवडय़ात सलग तीन दिवस टॅक्सी व्यवसायिकांनी संप पुकारला होता.

Web Title: Goa - notification issued for tourist taxis to install speed ​​governor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा