Goa: स्मार्ट सीटीच्या मुद्यावरून विरोधकांचा विधानसभेत हल्लाबोल, सभागृह समितीमार्फत चौकशीची मागणी
By वासुदेव.पागी | Published: July 20, 2023 12:35 PM2023-07-20T12:35:18+5:302023-07-20T12:35:52+5:30
Goa Assembly Election: स्मार्ट सीटी प्रकल्प हा मोठा घोटाळा असल्याचा दावा करून याप्रकरणात सभागृह समितीची मागणी करून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या मुद्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नाची मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही
- वासुदेव पागी
पणजी- स्मार्ट सीटी प्रकल्प हा मोठा घोटाळा असल्याचा दावा करून याप्रकरणात सभागृह समितीची मागणी करून विरोधकांनी सरकारलाधारेवर धरले. या मुद्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नाची मुख्यमंत्र्यांनीदिलेल्या उत्तरावर विरोधकांचे समाधान झाले नाही, आणि मुख्यमंत्र्यांनीसभागृह समितीमार्फत चौकशी करण्याची विरोधकांची मागणीही मंजूरकेली नाही.
कॉंग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आतापर्यंत स्मार्ट सीटीच्या नावाने ६०० कोटी खर्च करून सरकारनेपणजी शहराचे काय करून टाकले ते दिसतेच आहे. स्मार्ट सीटीचे कितीकाम झालेले आहे, आणि किती राहिले आहे याची माहिती त्यांनीविचारली. यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आतापर्यंत या प्रकल्पाचे ३३टक्के काम झालेले आहे. पूर्ण झालेल्या प्रकल्पांवर ३३३ कोटी खर्चझालेले आहेत असेही त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी यावेळी उपप्रस्न विचारतानाजमिनीची चाचणी न करता प्रकल्पाचे काम सुरू का केले. याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांकडे मागितले. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावर उत्तरदेताना सांगितले की ज्या ठिकाणी सॉईल टेस्टिंगची आवश्यकता होती. त्या ठिकाणी करण्यात आली असल्याचे सांगितले. युरी यांनी त्यानंतरस्मार्ट सीटीच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करताना ७ वर्षात सरकारनेकाय केले याची सभागृह समिती नियुक्त करून चौकशी करण्याचीमागणी केली. त्यावर इतर सदस्यांनीही त्याला साथ देताना सभागृहसमितीची मागणी केली.
सरदेसाईनां हवीय न्यायालयीन चौकशी कॉंग्रेस सदस्य युरी आलेमाव आणि एल्टन डिकॉस्टा हे स्मार्ट सिटीप्रकल्पातील कथित घोटाळ्याचा सभागृह समिती नियुक्त करून
चौकशीकरण्याची मागणी करीत होते. मात्र आमदार विजय सरदेसाई यांनी हाफार मोठा घोटाळा असून त्याची न्यायालयीन समिती नियुक्त करूनचचौकशी करावी अशी मागणी केली.