Goa: गोव्यात धीरयाेचा एक बळी, बाणावलीत घडली घटना
By सूरज.नाईकपवार | Published: January 15, 2024 10:52 PM2024-01-15T22:52:38+5:302024-01-15T22:53:26+5:30
Goa News: धीरयाेने आज सोमवारी एक बळी घेतला. जेनिटो वाझ (४१) असे मयताचे नाव असून, तो फात्रार्डे वार्का येथील रहिवाशी आहे. कोपेवाडो बाणावली येथील एका खुल्याजागेत धीरयाचे आयोजन केले होते.
- सूरज नाईकपवार
मडगाव - धीरयाेने आज सोमवारी एक बळी घेतला. जेनिटो वाझ (४१) असे मयताचे नाव असून, तो फात्रार्डे वार्का येथील रहिवाशी आहे. कोपेवाडो बाणावली येथील एका खुल्याजागेत धीरयाचे आयोजन केले होते. यावेळी उधळलेल्या एका रेडयाने जेनिटो याच्या पोटात शिंग खुपसले. त्यात तो गंभीर जखमी झाला. अतिरक्तस्त्राव होउन तो निपचित पडला. मागाहून त्याला येथील एका खाजगी इस्पितळात दाखल केले असता नंतर त्याला मृत्यू आला. सांयकाळी उशिरा ही घटना घडली. मागच्या आठवडयात बाणावली येथील समुद्र किनारी एका ब्रिटीश महिला पर्यटावरही उधळलेल्या बैलाने हल्ला केला होता. सदया ही महिलाही मडगावच्या एका खाजगी इस्पितळात उपचार घेत आहे.
दरम्यान सोमवारी घडलेल्या घटनेविषयी कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मयताच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार जेनिटो हा आपल्या गोठयात गुरांना खादय घालत असताना, त्याच्यावर गुराने हल्लाने केल्याने तो जखमी झाला व नंतर त्याचे उपचारअंती निधन झाल्याचे सांगितल्याचे म्हटले असून, अनैसर्गिक मृत्य म्हणून तुर्त पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुभाष गावकर पुढील तपास करीत आहेत