Goa: ५ अतिरिक्त जिल्हाधिकारी, ४३ मामलेदार, २२ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश
By किशोर कुबल | Published: February 15, 2024 12:54 PM2024-02-15T12:54:22+5:302024-02-15T12:55:18+5:30
Goa News: येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाय्रांच्या बदल्यांचे सत्र चालूच आहे. बुधवारी रात्री पाच अतिरिक्त जिल्हाधिकारी, २२ उपजिल्हाधिकारी व ४३ संयुक्त मामलेदार तसेच मामलेदारांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला.
- किशोर कुबल
पणजी - येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाय्रांच्या बदल्यांचे सत्र चालूच आहे. बुधवारी रात्री पाच अतिरिक्त जिल्हाधिकारी, २२ उपजिल्हाधिकारी व ४३ संयुक्त मामलेदार तसेच मामलेदारांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला.
लक्ष्मीकांत देसाई तिसवाडीचे नवे मामलेदार आहेत. तर विनोद दलाल - डिचोली, प्रतापराव गावकर - बार्देस, राजेश साखळकर-सत्तरी, दशरथ गांवस -केपें, प्रवीण गांवस-सांगे, अनंत मळीक-फोंडा, जितेंद्र बुगडे -काणकोण असे नवे मामलेदार आहेत.
अलीकडेच कार्मिक खात्याने मामलेदारांच्या बदल्यांचा आदेश काढला होता. तिसवाडीत अनंत मळीक वगैरेंनी नव्या पदावा ताबाही घेतला होता परंतु गुरुवारी रात्री नव्याने आदेश काढण्यात आला.
अतिरिक्त जिल्हाधिकाय्रांच्या बदल्या
पाच अतिरिक्त जिल्हाधिकाय्रांच्या बदल्यांचा आदेश काढण्यात आला असून केदार नाईक यांची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ या पदी, दीपक देसाई यांची यांची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-१ या पदी, रोहित कदम यांची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-३ या पदी, विशाल कुंडईकर यांची दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ या पदी तर पुंडलिक खोर्जुवेंकर यांची केदार नाईक यांची दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-३ या पदी बदली केली आहे.
दरम्यान, २२ उपजिल्हाधिकाय्रांच्या बदल्यांचा आदेशही काढण्यात आला आहे. अबकारी खात्याचे साहाय्यक आयुक्त श्रीकांत पेडणेकर यांच्याकडे उपजिल्हाधिकारी, दक्षता या पदाचा अतिरिक्त ताबा दिला आहे.