ओठाखाली टोचलेल्या स्टडस्मुळे पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 05:22 PM2019-02-13T17:22:51+5:302019-02-13T17:27:42+5:30

विदेशी पर्यटकांच्या सतत संपर्कात राहिल्याने गोव्यात समुद्र किना-यावर शॉक्समध्ये काम करणारे वेटरही या पर्यटकांसारखेच हातावर किंवा अंगावर टॅटू गोंदवून घेतात. काहीजण चेह-यावर स्टड टोचून घेतात. हिमाचल प्रदेशच्या रणजीत सिंग या वेटरची हत्या करणा-या निम तमांग या आरोपीनेही आपल्या ओठाखाली अशाचप्रकारे दोन स्टड टोचून घेतले होते. याच स्टडमुळे पोलीस त्याला ओळखू शकले आणि तो अलगद पोलिसांच्या जाळ्यातही सापडला.

Goa : Palolem restaurant waiter from Nepal ‘kills’ colleague, Police arrest ‘murderer’ in 6 hrs | ओठाखाली टोचलेल्या स्टडस्मुळे पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या 

ओठाखाली टोचलेल्या स्टडस्मुळे पोलिसांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या 

Next

- सुशांत कुंकळयेकर

काणकोण - विदेशी पर्यटकांच्या सतत संपर्कात राहिल्याने गोव्यात समुद्र किना-यावर शॉक्समध्ये काम करणारे वेटरही या पर्यटकांसारखेच हातावर किंवा अंगावर टॅटू गोंदवून घेतात. काहीजण चेह-यावर स्टड टोचून घेतात. हिमाचल प्रदेशच्या रणजीत सिंग या वेटरची हत्या करणा-या निम तमांग या आरोपीनेही आपल्या ओठाखाली अशाचप्रकारे दोन स्टड टोचून घेतले होते. याच स्टडमुळे पोलीस त्याला ओळखू शकले आणि तो अलगद पोलिसांच्या जाळ्यातही सापडला.

मंगळवारी दक्षिण गोव्यातील पाळोळे या समुद्र किना-यावरील शॉकवर हत्येची घटना घडली. हत्येनंतर आरोपी गायब झाला होता.  हत्या केल्यानंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करणार याची माहिती पोलिसांना असल्यामुळेच काणकोण रेल्वे स्थानकावर तसेच इतर ठिकाणी साध्या वेशातील पोलीस त्याच्या मागावर होते. आरोपी पळून जाणार हा पोलिसांचा होरा खरा ठरला. ट्रेन चुकल्यामुळे नंतरची गाडी कधी येणार याची विचारपूस करणारा संशयित या स्टेशनवर तैनात केलेल्या नागेंद्र परीट याच्या दृष्टीस पडला. त्यापूर्वीच सर्व पोलिसांकडे संशयिताची छायाचित्रे पोहोचविण्यात पोलीस यंत्रणा यशस्वी ठरली होती.

ट्रेनची विचारपूस करणा-या त्या इसमाच्या ओठाखालीही दोन स्टड टोचलेले नागेंद्रच्या लक्षात आले आणि आपल्याला हवा असलेला संशयित हाच याची त्याला खात्रीही पटली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, मूळचा नेपाळमधील रहिवासी असलेला पण मागची नऊ वर्षे गोव्यात वास्तव करुन असलेल्या निम तमांग याला स्पॅनीश भाषेसह अन्य काही विदेशी भाषा अवगत होत्या. त्यामुळेच विदेशी पर्यटकांकडे त्याची लवकर गट्टी जमायची. या पर्यटकांना तो साईट सिईंगलाही घेऊन जायचा. याच पर्यटकांच्या सान्निध्यात कित्येक वर्षे असल्यामुळे त्यानेही आपल्या ओठाखाली विदेशी पर्यटकाप्रमाणे स्टड टोचून घेतले होते. संशयिताने विदेशी पर्यटकांच्या संपर्कात राहण्यासाठी आपली फेसबुक पेजही तयार केली होती. कित्येक विदेशी युवतीबरोबरचे फोटो त्याने आपल्या फेसबूकवर टाकले होते. याच फेसबूक पेजवरुन पोलिसांनी त्याचा फोटो उतरवून घेत सर्व पोलिसांकडे पाठवून दिला आणि याच फोटोमुळे संशयित पोलिसांच्या हातीही लागला.

काणकोणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हत्या प्रकरणात अटक केलेल्या तमांगला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला सहा दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड देण्यात आला. मृत रणजीत सिंग याच्या मृतदेहाचा पोस्टमार्टेम बुधवारी सकाळी पूर्ण झाला. डोक्यावर केलेल्या प्रहारामुळे कवटी फुटल्याने त्याला मृत्यू आल्याचे या शवचिकित्सा अहवालात म्हटले आहे. देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, रणजीत सिंग हा याच पर्यटक सीझनमध्ये पहिल्यांदाच गोव्यात आला होता.

संशयित तमांग याला अटक करण्यात मोलाची कामगिरी केलेल्या पोलीस कॉन्स्टेबल नागेंद्र परीट यांना पोलीस खात्याने पाच हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे. परीट यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळेच आरोपी हाती लागू शकला असे दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी सांगितले. खून केल्यानंतर सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास संशयित तमांग काणकोण रेल्वे स्थानकावर आला. मात्र त्यावेळी त्याला ट्रेन चुकल्याने पुढची ट्रेन किती वाजताची आहे याची चौकशी तो करत होता. हे दृष्य परीट याने पाहिले आपल्या व्हॉटस्अॅपवर असलेल्या फोटोसारखीच समोरची व्यक्ती असल्याचे त्याच्या ध्यानात आले.

मात्र त्यावेळी तो एकटाच असल्याने त्याने त्याला एकदम पकडण्याऐवजी हळूच तो त्याच्या जवळ गेला. तो पोलीस आहे याची कल्पना संशयिताला नव्हती. त्यामुळे आपल्याला तुङया मोटरसायकलवरुन बसस्टँडर्पयत सोडतो का असे तमांगने त्याला विचारले. नागेंद्रने त्याला आपल्या मोटरसायकलवर बसवून चावडीवरच्या बसस्थानकार्पयत आणले. या बसस्थानकावर आणखी एक पोलीस शिपाई तैनात होता. दुसरा पोलीस शिपाई दिसल्याबरोबर नागेंद्रने त्याला खाली उतरवले आणि क्षणाचाही विलंब न करता त्या दोघांनी आरोपीवर झडप घातली आणि अशातरेने खुनाची घटना घडून केवळ सहा तासांच्या अवधीत संशयित जेरबंद झाला.

Web Title: Goa : Palolem restaurant waiter from Nepal ‘kills’ colleague, Police arrest ‘murderer’ in 6 hrs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.