२लाख ७१हजार किमंतीच्या ड्रग्सह गोवा पोलिसांनी पकडलेल्या आनंदची न्यायालयीन कोठडीत रवानगी
By सूरज.नाईकपवार | Published: March 10, 2024 12:03 PM2024-03-10T12:03:05+5:302024-03-10T12:03:25+5:30
संशयिताला कोलवाळ तुरुंगात पाठवून देण्यात आले.मागच्या आठवडयात २ मार्च रोजी मडगाव पोलिसांनी मूळ मांद्रे येथील आनंद याला येथील कोकण रेल्वेस्थानकाजवळील हॉलीक्रॉस रोड येथे ताब्यात घेउन झडती घेतली असता, त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले होते.
मडगाव: २ लाख ७१ हजार रुपये किमंतीच्या अमली पदार्थासह गोव्यातील मडगाव पोलिसांनी अटक केलेल्या आनंद हरिश्चंद्र साळगावकर (४०) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. संशयिताची पोलिस कोठडीची मुदत संपल्यानतंर त्याला न्यायालयात उभे केले असता, त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नंतर संशयिताला कोलवाळ तुरुंगात पाठवून देण्यात आले.मागच्या आठवडयात २ मार्च रोजी मडगाव पोलिसांनी मूळ मांद्रे येथील आनंद याला येथील कोकण रेल्वेस्थानकाजवळील हॉलीक्रॉस रोड येथे ताब्यात घेउन झडती घेतली असता, त्याच्याकडे अमली पदार्थ सापडले होते.
यात ३.८० ग्रॅम एमडीएमए, १८ इस्टोसी टॅब्लेट, १४.६६ ग्रॅम चरस व ०.०८ ग्रॅम एलएसडी पेपर होते. कारमधून हा अमली पदार्थ घेउन तो मडगावला आला होता. पोलिसांना त्याबाबत माहिती मिळाली होती. पोलिस त्याच्या मागावर होते. पोलिसांनी त्याला नंतर पकडले होते. ती कारही जप्त केली होती.
२० (ब) , (अ) व कलम २२ (ब) अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायदा १९८५ अंतर्गत संशयितावर गुन्हा नोंद केला होता. नंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडीही देण्यात आली होती.