नोकरीच्या आमिषानं फसवणूक करणाऱ्या मनोजकुमारविरोधात लूकआऊट नोटीस जारी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 07:39 PM2019-01-19T19:39:59+5:302019-01-19T19:42:11+5:30

मनोजचे कार्यालय सध्या बंद असून, तो राय येथे रहात असलेल्या त्याच्या घरातही नाही.

goa police likely to issue lookout notice against for fraud | नोकरीच्या आमिषानं फसवणूक करणाऱ्या मनोजकुमारविरोधात लूकआऊट नोटीस जारी होणार

नोकरीच्या आमिषानं फसवणूक करणाऱ्या मनोजकुमारविरोधात लूकआऊट नोटीस जारी होणार

Next

मडगाव:  विदेशात नोकरी देतो असं सांगून  गोव्यातील युवकांना गंडा घालणारा मूळ नवी दिल्ली येथील मनोजकुमार हा सध्या फरार असल्याने त्याच्याविरुद्ध लूकआउट नोटीस जारी केली जाईल अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. मनोजचे कार्यालय सध्या बंद असून, तो राय येथे रहात असलेल्या त्याच्या घरातही नाही. सध्या मनोजकुमार हा फरार आहे. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून संगणकही जप्त केले आहे. या प्रकरणी पुढील तपास चालू असल्याची माहिती मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली.

मनोजकडे कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांनाही त्याने पगार दिलेला नाही, असेही पोलीस तपासात आढळून आले आहे. पोलिसांनी त्याच्या कार्यालयातून काही पासपोर्ट आणले असून फसवणूक झालेल्यांचा जबाबही नोंदवण्यात येत आहे. मनोजकुमार हा मूळ दिल्लीतील आहे तो तेथे पळून गेल्याचा संशय आहे. दरम्यान मनोज कुमारवर गुन्हा नोंद झाल्याची बातमी वर्तमानपत्रकात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्याकडून फसविले गेलेल्या अनेक युवकांनी मडगाव पोलीस ठाणो गाठून आपली कैफियत पोलिसांसमोर मांडण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी मनोजविरुध्द भारतीय दंड संहितेच्या 420 कलमाखाली गुन्हा नोंदविला. मनोजने मडगावात संपर्क सोल्युशन या नावाने कार्यालय थाटले होते. आखातात तसेच परदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेक युवकांना गंडा घातला होता. मनोजकुमारकडून फसविले गेलेल्या युवकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सुशांत कदम यांनी परवा संशयिताविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यापूर्वी संशयिताकडून फसविले गेलेल्या युवकांनी मडगाव पोलीस ठाणे गाठले होते. मात्र कुणीही तक्रार देण्यास पुढे न आल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदविला नव्हता. काल कदम यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मनोजविरोधात गुन्हा नोंद केला. विदेशात नोकरी देण्याच्या जाहिराती त्यांनी केली होती. या जाहिरातील भुलून अनेक युवकांनी त्याच्याकडे नोकरीसाठी पैसे दिले होते.

फसवणूक झालेल्यामंध्ये केवळ गोव्यातील नव्हे तर उत्तर प्रदेशातील युवकाचाही समावेश आहे. परराज्यातील युवकांनेही मनोजकुमार याने गंडा घातला असल्याने फसवणुकीची रक्कम करोडोंच्या घरातही जाण्याची शक्यता आहे. आखाती प्रदेशात कुवेत, दुबई बरोबरच कॅनडा येथे नोकरी मिळवून देतो, असे सांगून युवकांकडून वीस हजार तर काहीजणांकडून पंचवीस ते सत्तर हजार रुपयेही घेतले होते. वर्ष होउन गेले तरी नोकरी मिळत नसल्याने काहीजणांनी मनोजकुमार याला गाठून आपले पैसे परत देण्यास सांगितले होते. त्यानुसार त्याने धनादेशही दिले होते. मात्र बँकेत त्याच्या अकांउटवर पैसेच नसल्याने हे धनादेश वठविले गेले नाही. त्यामुळे काहीजणाने त्याला कार्यालयात गाठून जाबही विचारला होता.   यानंतर संतप्त युवकांनी मडगाव पोलीस ठाणो गाठून तेथील अधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली होती. सुशांत कदम या युवकाने या प्रकरणी नंतर मडगाव पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदविली होती. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर पुढील तपास करीत आहेत.

Web Title: goa police likely to issue lookout notice against for fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.