न्यूड पार्टी जाहिरातवाला पोलिसांच्या जाळ्यात, बिहारमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 09:58 PM2019-09-29T21:58:33+5:302019-09-29T22:02:36+5:30

न्यूड पार्टीची वादग्रस्त जाहीराती मागे कोण आहे हे शोधण्यासाठी पोलिसांना इंटरनेट प्रोटोकॉलचा धागा पकडून तपास सुरू केला.

In a goa police raid on a Nude Party advertisement, the accused arrested from bihar | न्यूड पार्टी जाहिरातवाला पोलिसांच्या जाळ्यात, बिहारमधून अटक

न्यूड पार्टी जाहिरातवाला पोलिसांच्या जाळ्यात, बिहारमधून अटक

googlenewsNext

पणजी :  गोव्यात न्यूड पार्टीची जाहिरात सोशल मिडियावर व्हायरल करणारा माणूस पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. गोवा पोलिसांच्या पथकाने बिहार येथे जाऊन त्याला पकडले. गोव्यात पेडणे तालुक्यात न्युड पार्टीचे आयोजि करण्यात आल्याची जाहीरात सोशल मिडियावर व्हायर झाल्यामुळे एकच खळबळ माजली होती. ऐन पर्यटन हंगाम सुरू होण्याच्या वाटेवर असतानाच हा प्रकार उघडकीस आल्यामुळे सरकारने ताबडतोब या प्रकरणात तपासाचा आदेश पोलिसांना दिला होता. 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या जाहिरातीचा खरेपणा तपासणे आणि त्यामागे कोण आहे याची माहिती काढण्यास पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार आठवडाभरात पोलिसांनी ही जाहिरात व्हायरल करणाऱ्या माणसाला पकडले. संशयिताला बिहार येथे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. पोलीस मुख्यालयातूनही त्याला पुष्टी देण्यात आली. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव अद्याप पोलिसांनी जाहीर केलेले नाही. 

न्यूड पार्टीची वादग्रस्त जाहीराती मागे कोण आहे हे शोधण्यासाठी पोलिसांना इंटरनेट प्रोटोकॉलचा धागा पकडून तपास सुरू केला. त्याच धाग्यातून त्याच्या मोबाईलचाही पत्ता मिळविला आणि त्याचे लॉकेशनही मिळविले. संशयिताची माहिती मिळाल्यानंतर क्राईम ब्रँचचे एक पथक निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये दाखल झाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला पकडून मोहीम फत्ते केली.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार न्यूड पार्टीच्या नावाने पैसे कमविण्यासाठीच संशयित हा उद्योग करीत होता, तशी कबुलीही त्याने पोलिसांना दिली आहे. 
 

Web Title: In a goa police raid on a Nude Party advertisement, the accused arrested from bihar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.