गोव्यात कार फिल्मिंग व फॅन्सी क्रमांक पाटीविरुद्ध कारवाई मोहीम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 04:07 PM2018-09-23T16:07:06+5:302018-09-23T16:08:06+5:30
गोव्यात 24 सप्टेंबरपासून पोलीस फिल्मिंग करण्यात आलेल्या गाड्यांविरुद्ध व फॅन्सी क्रमांक पाट्यांच्या विरोधात कारवाई सुरू करणार आहेत.
पणजीः गोव्यात 24 सप्टेंबरपासून पोलीस फिल्मिंग करण्यात आलेल्या गाड्यांविरुद्ध व फॅन्सी क्रमांक पाट्यांच्या विरोधात कारवाई सुरू करणार आहेत. गोव्याबाहेरील वाहनेही या कारवाईपासून वगळली जाणार नाहीत.
नशेबाज चालकांविरुद्धच्या मोठ्या कारवाईनंतर आता पोलिसांनी काचा फिल्मिंग करून काळ्या करणाऱ्या कारचालकांविरुद्ध तसेच नियमबाह्य क्रमांकपाट्या वापरणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध कारवाई करणार आहेत. कारवाई सोमवारपासून सुरू केली जाणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे अधीक्षक दिनराज गोवेकर यांनी दिली.
फिल्मिंग केलेल्या गाडीच्या काचांचे फिल्मिंग त्याच ठिकाणी उतरविले जाईल. तसेच फॅन्सी क्रमांक पाट्या वापरणाऱ्यांना त्या बदलून पोलिसांना पुन्हा आणून दाखवायला सांगितले जाणार आहे. त्याच बरोर सिग्नलच्या संकेतांचे पालन न करणाऱ्यांविरूद्ध मात्र कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यांचे चालक परवाने निलंबित करण्यासाठी वाहतूक खात्याकडे पाठविले जाणार आहेत.