गोवा : पावसाचा धुमाकूळ सुरुच, घरांत शिरले पुराचे पाणी, शेतीबागायतींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 03:02 PM2024-07-15T15:02:07+5:302024-07-15T15:02:15+5:30
राज्यात गेला आठवडाभर धुवाधार पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. मुसळधार पडत असलेल्या पावसाने करोडो रुपयांचे नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे.
नारायण गावस :
पणजी: राज्यात गेला आठवडाभर धुवाधार पडत असलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. मुसळधार पडत असलेल्या पावसाने करोडो रुपयांचे नुकसान झाले असून जीवितहानीही झाली आहे. लाेकांच्या घरांच्या भिंती कोसळल्या तसेच शेतीबागायतींचे नुकसात झाले. राज्यातील बहुतांश सर्व तालुक्यांना या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.
पावसाचा धुमाकुळ सुरुच असून दीड महिन्यांत पाऊस शंभर पर्यंत पाेहचत आला आहे. आतापर्यंत एकूण ४१ टक्के पाऊस झाला. गेल्या २४ तासांत राज्यात ६.४ इंच पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने आजही रेड अलर्ट जारी केला असल्याने नर्सरी ते १२ वी पर्यंत शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
राज्यातील धरणे ओव्हरफ्लो
मुसळधार पडत असलेल्या पावसाने राज्यातील बहुतांश धरणे ओव्हरफ्लो झाली आहे. तिळारी धरण ओव्हरफ्लो झाल्याने आज सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. तसेच अंजूणे धरण ८९.४ मीटरपर्यंत भरले असल्याने ९० मीटरची पातळी भरल्यावर या धरणातूनही आज पाणी सोडण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे साळावली, चापोली आमठाणे ही धरणेही १०० टक्के भरली आहेत.
पडझडीमुळे मोठे नुकसान
राज्यात मुसळधार पावसामुळे माेठी पडझड झाली आहे. या वित्त हानीप्रमाणे जीवितहानीही झाली आहे. काही लोकांच्या घरच्या भिंती पावसाने कोसळल्या. त्यामुळे लाखो रुपयाची हानी झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक लोकांच्या घरावर झाडे पडून मोठे नुकसान झाले आहे. तसेच रस्त्यावरील गाड्यावर झाडे पडून मोठे नुकसान झाले. काही लाेकांच्या घरावर वीज खांब पाडल्याने वीज खंडित होण्याच्या मोठ्या घटना घडल्या.
शेतीबागायतींची मोठी हानी
राज्यात पडत असलेल्या मुसळधार पवसाचा जास्त फटका हा शेती बागायीतना बसला आहे. अनेक लोकांच्या शेती बागायती पुराच्या पाण्याखाली गेल्याने शेतीची मोठ्या प्रमाणात नाशाडी झाली आहे. सत्तरी, बार्देश, पेडणे, काणकोण बहतांश सर्व तालुक्यांना याचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी कृषी खात्याने याकडे लक्ष घालून नुकसान भरपाई देण्याची मागी केली आहे.