कोविड: कोरोना रूग्णांच्या बाबतीत गोवा चौथ्या क्रमांकावर
By वासुदेव.पागी | Published: January 8, 2024 06:48 PM2024-01-08T18:48:32+5:302024-01-08T18:49:22+5:30
रविवारी मागील दोन दिवसात कुणालाही इस्पितळात दाखल करावे लागले नाही.
पणजी: जवळ जवळ शुन्यावर पोहोचलेल्या कोविडच्या प्रकरणांनी अचानक उचल खाऊन पुन्हा अर्धशतक पार केल्यामुळे निर्माण झालेले अनिश्चिततेचे वातावरण शमताना दिसत आहे. मागील पूर्ण आठवड्यात कोविडची प्रकरणे नियंत्रणात असून २४ तासात आढळणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होत आहे. सोमवारी २४ तासात ३ नवीन कोविड बाधित आढळून आले आहेत. तसेच चाचणी करून घेणाऱ्यांची संख्याही कमी होताना दिसत आहे. सोमवारी ९० चाचणी अहवाल जाहीर करण्यात आले. ६० पेक्षा अधीक झालेली सक्रीय बाधितांची संख्या आता ४६ पर्यंत खाली आली आहे.
तसेच इस्पितळात दाखल करण्याचीही आता गरज भासत नाही असे आढळून आले आहे. रविवारी मागील दोन दिवसात कुणालाही इस्पितळात दाखल करावे लागले नाही. दरम्यान गोव्यात आढळलेल्या कोविडच्या जेएन -१ व्हायरसच्या एकूण ४७ प्रकरणांनतर गोवा देशात सर्वाधिक जेएन-१ बाधित असल्याचे मानले जात होते. परंतु आता कर्नाटकात सर्वाधिक १९९, केरळात १४८, महाराष्ट्रात १३९ प्रकरणे आढळली आहेत. त्यामुळे गोव्या देशात चौथ्या क्रमांकावर आहे.