Goa: गोव्यात जुन्या गृहनिर्माण इमारतींना दिलासा ;पुनर्विकासासाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करा

By किशोर कुबल | Published: September 26, 2023 02:25 PM2023-09-26T14:25:07+5:302023-09-26T14:25:26+5:30

Goa News: सहा महिन्यात नवीन नगर नियोजन कायदा येईल, असे स्पष्ट करताना खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी २० वर्षांपेक्षा अधिक जुन्या गृहनिर्माण इमारती नव्याने बांधण्यासाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

Goa: Relief for old residential buildings in Goa; apply within 30 days for redevelopment | Goa: गोव्यात जुन्या गृहनिर्माण इमारतींना दिलासा ;पुनर्विकासासाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करा

Goa: गोव्यात जुन्या गृहनिर्माण इमारतींना दिलासा ;पुनर्विकासासाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करा

googlenewsNext

- किशोर कुबल 
पणजी - सहा महिन्यात नवीन नगर नियोजन कायदा येईल, असे स्पष्ट करताना खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी २० वर्षांपेक्षा अधिक जुन्या गृहनिर्माण इमारती नव्याने बांधण्यासाठी ३० दिवसांच्या आत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

पत्रकार परिषदेत विश्वजित म्हणाले की, ’ सध्याचा नगरनियोजन कायदा १९७० च्या दशकात माझ्या पित्याने आणला होता. त्यात आता बय्राच सुधारणा करणे आवश्यक बनले आहे. सरकार लोकांच्या हिताचेच निर्णय घेत आहे. २० वर्षांहून अधिक काळ झालेल्या अनेक गृहनिर्माण वसाहती आहेत. काही सोसायट्यांना त्या नव्याने बांधायच्या आहेत. नगर नियोजन खात्याकडे प्रस्ताव आल्यास त्वरित मंजूर करु, जेणेकरुन लोकांना नव्याने इमारती बांधता येतील. त्यासाठी चटई निर्देशांक वाढवून देऊ. इमारतींची उंचीही वाढवता येईल त्यामुळे बिल्डरनाच नव्हे तर सध्या जुन्या इमारतींमध्ये वास्तव्य करणाय्रा लोकांनाही त्याचा फायदा होईल. निर्धारित शुल्क भरुन इमारत पुनर्विकासाठी परवाना घेता येईल.
 

Web Title: Goa: Relief for old residential buildings in Goa; apply within 30 days for redevelopment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा