Goa: इफ्फीच्या तयारीचा आढावा, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक
By किशोर कुबल | Published: November 14, 2023 11:33 PM2023-11-14T23:33:32+5:302023-11-14T23:34:26+5:30
Goa News: इफ्फी पाच दिवसांवर येऊन ठेपली असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल तयारीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
- किशोर कुबल
पणजी - इफ्फी पाच दिवसांवर येऊन ठेपली असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल तयारीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
५४ वा अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात येत्या २० तारीखपासून सुरू होत असून २८ नोव्हेंबर पर्यंत जाणार आहे. हा चित्रपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही कंबर कसली आहे. काल बैठक घेऊन त्यांनी एकूण तयारीचा आढावा घेतला.
या चित्रपट महोत्सवासाठी आतापर्यंत देश-विदेशातील ४ हजार प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. प्रतिनिधींचा आकडा २५ हजारांवर जाईल, असा विश्वास केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री एल. मुरुगन यांनी व्यक्त केला आहे. हा आंतरराष्ट्रीय महोत्सव जगभरातील सिनेप्रेमींना पर्वणी आहे.
इंडियन पॅनोरमा विभागात पूर्ण लांबीचे २५ चित्रपट असून २० लघुपटांचे प्रदर्शन होणार आहे. यात सर्वाधिक १४ हिंदी चित्रपटांशिवाय मल्याळम, मराठी, कोकणी, कन्नड, आदी भाषांतील चित्रपटही सिने रसिकांना पाहता येणार आहेत.