गोवा क्रांती दिवस! मुक्तिलढ्याच्या पहिल्या हाकेचे लोहिया मैदान साक्षीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 09:55 AM2023-06-18T09:55:55+5:302023-06-18T09:57:04+5:30

१८ जून १९४६ रोजी संध्याकाळी ४.१५ वाजता डॉ. राम मनोहर लोहिया यांनी पालिका चौकातील कोमुनिदादच्या इमारतीच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानावर गोवा मुक्तिलढ्याची ज्योत पेटवून पोर्तुगीज सालाझारशाहीने परत जावे, असे आव्हान दिले. एवढेच नव्हे, तर गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांनी डॉ. लोहिया यांच्यासोबत पोर्तुगिजांविरुद्ध गोवामुक्तीचा लढा पुकारला.

goa revolution day lohia Maidan witnessed the first call of mukti ladha | गोवा क्रांती दिवस! मुक्तिलढ्याच्या पहिल्या हाकेचे लोहिया मैदान साक्षीदार

गोवा क्रांती दिवस! मुक्तिलढ्याच्या पहिल्या हाकेचे लोहिया मैदान साक्षीदार

googlenewsNext

विठ्ठल सुकडकर, लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : मडगाव पालिका चौकात कोमुनिदाद इमारतीच्या मागे असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा भारत छोडो आंदोलनाचे सदस्य डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या स्मारकाचे ठिकाण लोहिया मैदान है गोव्याच्या इतिहासात ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. गोवामुक्ती लढ्याला याच मैदानावरून सुरुवात झाली होती. हे मैदानाच मुक्तिलयाचे प्रत्यक्ष साक्षीदार आहे.

गोव्यात ४५१ वर्षे पोर्तुगिजांनी राज्य केले. सालाझारशाहीची राजवट त्या काळात लोकांवर लादली होती. गोवा हा भारतापासून वेगळा होता. भारतात ब्रिटिश राजवट होती, तर गोव्यात पोर्तुगिजांची राजवट होती. भारतीयांना ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवायचे होते, तर गोवेकरांना पोर्तुगिजांपासून मुक्ती मिळवायची होती. देशात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध भारत छोडो आंदोलन सुरू केले होते, तर गोव्यात स्वातंत्र्यसैनिकांनी पोर्तुगीज राजवटीविरुद्ध मुक्तिलढ्याला प्रारंभ केला होता, पण गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांना मुक्तिलढ्यासाठी मार्गदर्शक नव्हते.

डॉ. राम मनोहर लोहिया हे ब्रिटिश सरकारविरोधात देशात सुरू केलेल्या भारत छोड़ो आंदोलनाचे सदस्य होते. या भारत छोडो आंदोलनाच्या अनुषंगाने गोव्यालाही पोर्तुगिजांपासून मुक्ती मिळावी हे डॉ. लोहिया यांचे उद्दिष्ट होते. त्यामुळे पोर्तुगिजांविरुद्ध क्रांतिकारक लढा सुरू करण्यासाठी ते गोव्यात आले. होते. गोव्याचे स्वातंत्र्यसैनिक पोर्तुगिजांपासून मुक्ती मिळविण्यासाठी एकदम उत्सुक होते. त्या काळात असोळणा येथे डॉ. ज्यूलियांव] मिनेझिस यांच्या निवासस्थानी स्वातंत्र्यसैनिकांच्या गोवा मुक्तिलढयाच्या गुप्त बैठका होत होत्या. त्यावेळी भारत छोड़ो आंदोलनाचे सदस्य डॉ. राम मनोहर लोहिया असोळणा येथे दाखल झाले.

असोळणाच्या बाजारात डॉ. राम मनोहर लोहिया यांच्यासोबत गोव्याच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची १८ जून १९४६ रोजी दुपारी छोटेखानी बैठक झाली. त्यानंतर सर्व स्वातंत्र्यसैनिक मडगावच्या दिशेने रवाना झाले त्याचदिवशी म्हणजे १८ ४६ रोजी संध्याकाळी ४.१५ जून १९४६ वाजता डॉ. राम मनोहर लोहिया यांनी पालिका चौकातील कोमुनिदादच्या इमारतीमागे असलेल्या मोकळ्या मैदानावर गोवा मुक्तिलढ्याची ज्योत पेटवून पोर्तुगीज सालाझारशाहीने परत जावे, असे आव्हान दिले. एवढेच नव्हे, तर गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांनी डॉ. लोहिया यांच्यासोबत पोर्तुगिजांविरुद्ध गोवामुक्तीचा लढा पुकारला.

यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पुरुषोत्तम काकोडकर, डॉ ज्युलियांग निनेझिस, नीळकंठ कारापूरकर, विनायक मयेकर, विश्वनाथ लवंदे, वसंत महिये, लक्ष्मीकांत भेंब्रे, इन्व्हानियो जॉर्ज, शामराव मडकईकर, जयवंत मांजरेकर, बाला काकोडकर, पच्चीका सरदेसाई, जन काव्हालो, दियोनिजियो रिबेरो मुझे इनासियो लायेला, मुझे फ्रान्सिस्को मार्टिन्स, वसंत कारे, गिलेर्म डिसोझा व इतर स्वातंत्र्यसैनिकांची उपस्थिती होती.

शिक्षण, मैत्री व मुक्तिलढा

जर्मनीत शिक्षण पूर्ण करून दोघेही मायदेशी परतले. नंतरच्या काळात डॉ. राम मनोहर लोहिया है असोळणात डॉ. ज्युलियांव मिनेनिस यांच्या घरी येत-जात होते. दोघांत ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारत छोड़ो आंदोलनाची चर्चा नेहमी होत होती. त्या चर्चेतूनच हॉ. लोहिया यांनी डॉ. ज्युलिया मिनेनिस यांना गोवा मुक्तिची प्रेरणा दिली. त्यानुसार डॉ. ज्यूलियाय मिनेझिस यानी गोव्याच्या स्वातंत्र्य सैनिकांना एकत्र करून असोळणात आपल्या निवासस्थानी डॉ. लोहिया यांची भेट करून दिली. तेथूनच खऱ्या अर्थाने गोव्याच्या मुलाला प्रारंभ झाला होता. गोवामुक्ती यात असोळणा गावाचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे असोळणा चौकातही डॉ. लोहिया यांचे स्मारक उभारून सरकारी पातळीवर लोहिया चौक म्हणून नामकरण करण्यात आले आहे.

डॉ. राम मनोहर लोहिया गोव्यात कसे आले?

डॉ. राम मनोहर लोहिया हे मूळचे अकबरपुर, उत्तर प्रदेशचे सुपुत्र दि. २३ मार्च १९१० रोजी त्यांचा जन्म झाला होता. ते भारत स्वातंत्र्यप्रेरक होते. विद्यार्थी काळी ते ब्रिटिशांच्या विरोधात कार्यरत होते. भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळावे हेच त्याचे उदिष्ट होते. त्यामुळे विद्यार्थी काळातही भारत स्वातंत्र्यात काम करीत होते. भारत छोड़ो आंदोलनात ते सक्रिय होते; पण उपशिक्षणासाठी ते जर्मनीत गेले. तिथे शिक्षण घेत असताना सुपुत्र डॉ. ज्युलियांव च्याशी त्याची मैत्री झाली. ज्यूलियाच हेदेखील स्वातंत्र्यलयाचे प्रेरक होते. यामुळे जर्मनीत शिकत असताना दोघांची घनिष्ठ मैत्री जमली.

 

Web Title: goa revolution day lohia Maidan witnessed the first call of mukti ladha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा