Goa: आरजी गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार
By काशिराम म्हांबरे | Published: December 13, 2023 12:39 PM2023-12-13T12:39:02+5:302023-12-13T12:40:09+5:30
Goa News:
- काशीराम म्हांबरे
म्हापसा - उत्तर आणि दक्षिण या लोकसभेच्या दोन्ही जागा रिव्होल्यूशनरी गोवन्स ( आरजी) पक्ष लढवणार आहे. दोन्ही जागांसाठी मिळून ५ उमेदवार निश्चित करण्यात आल्याची माहिती आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी पत्रकारांना दिली.
उत्तर गोव्यातून स्वत: मनोज परब तसेच खजिनदार अजय खोलकर यांची नावे निश्चित करण्यात आली असून दक्षिण गोव्यातून विश्वेश नाईक, रुबर्ट परेरा तसेच शैलेश नाईक ही तीन नावेनिश्चित करण्यात आली आहे. उत्तरेतून मनोज परब रिंगणात उतरण्याची संभावना आहे. उमेदवारांची निवड लोकशाई पद्धतीने करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक मतदार संघातील सक्रिय कार्यकर्त्यांना बोलावून उमेदवार निवडीसाठी मतदान घेण्यात आले. निवडण्यात आलेल्या उमेदवारांवर पक्षाच्या निवडणुक समितीच्या बैठकीत अंतिम उमेदवार निवडला जाणार असल्याचे परब म्हणाले.
होणारी लोकसभेठी निवडून आरजीसाठी अत्यंत महत्वाची आहे. गोवेकरांना सतावणारे विविध प्रश्न आजही प्रलंबीत आहेत. जे कधीच लोकसभेत मांडण्यात आलेले नाही. गोव्यात असलेल्या केंद्रीय आस्थापनात स्थानीकांना नोकºया दिल्या जात नाहीत. या विविध मुद्यावर स्थानीकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रश्न लोकसभेत मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत गरज असल्याचे परब म्हणाले. बाहेरून राज्यात येणारे पक्ष फक्त मतांची विभागणी करण्यासाठी निवडणूक लढवतात असाही आरोप त्यांनी केला.