5.4 कोटींच्या सिगारेटी तस्करी प्रकरणात गोवा कस्टम अधिकारी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 01:19 PM2019-01-08T13:19:56+5:302019-01-08T13:33:35+5:30

5.4 कोटींच्या विदेशी सिगारेट तस्करी प्रकरणात कस्टमच्या डीआरआय विभागाने गोवा कस्टमचे उपायुक्त महेश देसाई याच्यासह आणखी एका इसमाला कॉफेपोसा कायद्याखाली ताब्यात घेतले आहे.

goa Rs 5.4 crore smuggling racket: Customs officer detained | 5.4 कोटींच्या सिगारेटी तस्करी प्रकरणात गोवा कस्टम अधिकारी ताब्यात

5.4 कोटींच्या सिगारेटी तस्करी प्रकरणात गोवा कस्टम अधिकारी ताब्यात

Next
ठळक मुद्दे5.4 कोटींच्या विदेशी सिगारेट तस्करी प्रकरणात कस्टमच्या डीआरआय विभागाने गोवा कस्टमचे उपायुक्त महेश देसाई यांना कॉफेपोसा कायद्याखाली ताब्यात घेतले आहे. गोव्यात 2017 पासून तस्करीची टोळी वावरत असून हे दोन्ही संशयित त्यातील मुख्य असल्याचा डीआरआयला संशय आहे.गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात डीआरआयने मारलेल्या छाप्यात गोव्यात 5.4 कोटींच्या विदेशी सिगारेट पकडल्या होत्या.

मडगाव - 5.4 कोटींच्या विदेशी सिगारेट तस्करी प्रकरणात कस्टमच्या डीआरआय विभागाने गोवा कस्टमचे उपायुक्त महेश देसाई याच्यासह आणखी एका इसमाला कॉफेपोसा कायद्याखाली ताब्यात घेतले आहे. मात्र देसाई यांनी आपल्या छातीत कळा येत असल्याचा दावा केल्यानंतर त्यांना म्हापसा येथील आझीलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

परमिंदरसिंग छड्डा असे या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सध्या त्याला कोळवाळच्या मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले आहे. गोव्यात 2017 पासून तस्करीची टोळी वावरत असून हे दोन्ही संशयित त्यातील मुख्य असल्याचा डीआरआयला संशय आहे.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात डीआरआयने मारलेल्या छाप्यात गोव्यात 5.4 कोटींच्या विदेशी सिगारेट पकडल्या होत्या. यावेळी डीआरआयने देसाई यांच्या मिरामार येथील बंगल्याचीही झडती घेतली होती. या प्रकरणात आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: goa Rs 5.4 crore smuggling racket: Customs officer detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा