गोवा आरटीओ कॅशलेस, प्रणाली दोन महिन्यांत मार्गी लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:03 PM2018-04-10T23:03:58+5:302018-04-10T23:03:58+5:30
गोवा वाहतूक विभागाने कॅशलेस पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यवस्था केली आहे. कॅशलेस पेमेंटची सेवा उपलब्ध करुन देणारे गोवा आरटीओ देशातील पहिले ठरल्याचे सांगितले जात आहे.
पणजी : गोवा वाहतूक विभागाने कॅशलेस पेमेंट स्वीकारण्यासाठी व्यवस्था केली आहे. कॅशलेस पेमेंटची सेवा उपलब्ध करुन देणारे गोवा आरटीओ देशातील पहिले ठरल्याचे सांगितले जात आहे.
गोवा वाहतूक विभागाकडून यापुढे, "ऑन द स्पॉट", डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारेच पेमेंट स्वीकारले जाईल. संपूर्ण प्रणाली पुढील दोन महिन्यांत मार्गी लागेल, असे वाहतूक संचालक निखिल देसाई यानी सांगितले. रस्त्याच्या वाहनांची तपासणीत एखादा नियमभंग करताना सापडला तर रोख रक्कम नाही, तर कॅशलेस पद्धतीने व्यवहार केला जाईल.
इलेक्ट्रॉनिक पेमेंट गेटवे आणि पॉइंट ऑफ सेल मशीनची स्थापना केली. वाहतूक विभागाने 30 पीओएस मशीन्स घेतली आहेत.
राज्य परिवहन विभागाच्या सर्व कर आणि शुल्काची क्रेडिट आणि डेबिट कार्डाद्वारे ऑनलाइन व्यवहार पद्धतीद्वारे पैसे भरावे, असे आवाहन आहे. आज ऑनलाइन व्यवहार सुविधेसह वाहतूक विभागाने आपली नवीन वेबसाइट www.goatransport.gov.in सुरु केली. गेल्या 8 महिन्यांत 1.40 लाख आरसी पुस्तके आणि वाहन परवाने पोस्टाने पाठविण्यात आले आहेत.
मुख्य सचिव, धर्मेंद्र शर्मा, वाहतूक सचिव शिवप्रताप सिंग आयएएस यांनी गोव्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमधील नवीन वेबसाइट आणि पीओएस टर्मिनल्स फॉर कॅशलेस संकेतस्थळ लॉन्च केले.