Goa: बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरण दक्षिण गोवा सत्र न्यायालयात चालणार, पुढील सुनावणी २१ एप्रिलला
By सूरज.नाईकपवार | Published: April 5, 2023 04:39 PM2023-04-05T16:39:18+5:302023-04-05T16:39:40+5:30
Goa: गोव्याचे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा खटला दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयातच चालणार यावर बुधवारी शिक्कामोर्त्तब झाले. हा खटला अतिरिक्त महिला सत्र न्यायाधीक्षाकडे दयावा अशी मागणी केली होती.
- सूरज नाईक पवार
मडगाव - गोव्याचे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा खटला दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयातच चालणार यावर बुधवारी शिक्कामोर्त्तब झाले. हा खटला अतिरिक्त महिला सत्र न्यायाधीक्षाकडे दयावा अशी मागणी केली होती. काल बुधवारी दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष इर्शाद आगा यांच्या न्यायालयाने ही मागणी अमान्य केली. या खटल्याची आता पुढील सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार आहे. मंत्री बाबुश मोन्सेरात व रोझारियो उर्फ रोझी फेर्राव हे या प्रकरणातील संशयित आहेत. दोघेही खटल्याच्या सुनावणीच्या वेळी अनुपस्थित होते. २०१६ साली कथित बलात्काराची घटना घडली होती. बाबुशने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
सरकारी वकिल व्ही. जे . कॉस्ता यांनी हे प्रकरण महिलेशी संबधित असल्याने हा खटला महिला न्यायाधीक्षकाकडे वर्ग करावा अशी मागणी केली होती. तर संशयिताच्या वकिलाने गेली सात वर्षे हा खटला रेंगाळलेला असून, आमच्या अशिलाला न्याय मिळायला पाहिजे असे न्यायालयात सांगितले होते.