Goa: धक्कादायक: दिड वर्षाच्या चिमुरडी मुलीचा समुद्रात बुडून मृत्यू
By पंकज शेट्ये | Published: May 30, 2024 09:42 PM2024-05-30T21:42:54+5:302024-05-30T21:45:18+5:30
Goa News: खारीवाडा किनाऱ्यावर राहणाऱ्या एका कुटूंबातील दीड वर्षीय चिमुकल्या मुलीचा खारीवाडा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी (दि.३०) संध्याकाळी घडली. ती चिमुकली मुलगी घराच्या परिसरात खेळताना अचानाक सर्वांची नजर चुकवीत समुद्रात गेल्यानंतर तेथे बुडायला लागली.
- पंकज शेट्ये
वास्को - खारीवाडा किनाऱ्यावर राहणाऱ्या एका कुटूंबातील दीड वर्षीय चिमुकल्या मुलीचा खारीवाडा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरूवारी (दि.३०) संध्याकाळी घडली. ती चिमुकली मुलगी घराच्या परिसरात खेळताना अचानाक सर्वांची नजर चुकवीत समुद्रात गेल्यानंतर तेथे बुडायला लागली. लहान मुलगी बुडत असल्याचे तेथे असलेल्या लोकांना दिसून येताच त्यांनी तिला बाहेर काढल्यानंतर इस्पितळात नेले, मात्र तेथे पोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
वास्को पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरूवारी संध्याकाळी ६ च्या सुमारास ती दुर्देवी घटना घडली. वास्को, खारीवाडा येथील किनाऱ्यावर त्या चिमुकल्या मुलीचे कुटूंब तिच्यासोबत राहते. गुरूवारी संध्याकाळी ती चिमुरडी घराच्या बाहेर किनाऱ्यावर खेळत होती. त्यावेळी तेथे तिची आई होती अशी माहीती पोलीसांकडून मिळाली. दिड वर्षाची मुलगी खेळता खेळता अचानाक तिने आईची नजर चुकवीत ती समुद्रात जाऊन पोचली. समुद्रात पोचल्यानंतर तेथे ती बुडायला लागली. लहान मुलगी समुद्रात बुडत असल्याचे तेथे असलेल्यांना दिसून येताच त्यांनी त्वरित धाव घेऊन मुलीला बाहेर काढले. बुडाल्याने मुलीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला त्वरित वास्कोतील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी नेले, मात्र तेथे पोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
वास्को पोलीसांना घटनेची माहीती मिळाताच पोलीस निरीक्षक कपील नायक, पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका पाटील आणि इतर पोलीसांनी तेथे त्वरित धाव घेतली. ती घटना कशी घडली त्याबाबत पोलीसांनी माहीती घेतली. तसेच पोलीसांनी चिमुरडीच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह मडगाव येथील जिल्हा इस्पितळाच्या शव गृहात पाठवून दिला आहे. वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.