Goa: गोव्यात पोर्तुगीज अनुवाद सेवेचे समाजकल्याणमंत्र्यांकडून अनावरण
By किशोर कुबल | Published: September 26, 2023 02:52 PM2023-09-26T14:52:04+5:302023-09-26T14:55:04+5:30
Goa: समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते गोव्यात ॲानलाइन पोर्तुगीज अनुवाद सेवेचे अनावरण करण्यात आले. अनुवादासाठी ३५० रुपये प्रती पान शुल्क आकारले जाईल. पंधरा अनुवादक त्यासाठी नेमले आहेत. लोकांसाठी ही उत्तम सुविधा झालेली आहे.
- किशोर कुबल
पणजी - समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते गोव्यात ॲानलाइन पोर्तुगीज अनुवाद सेवेचे अनावरण करण्यात आले. अनुवादासाठी ३५० रुपये प्रती पान शुल्क आकारले जाईल. पंधरा अनुवादक त्यासाठी नेमले आहेत. लोकांसाठी ही उत्तम सुविधा झालेली आहे.
गोव्यात आल्वारा जमिनी तसेच अन्य अनेक दस्तऐवज पोर्तुगीज भाषेत आहेत ते अनुवादित करुन घेताना अनेक अडचणी येतात. आल्वारा जमिनींची प्रकरणे याच कारणास्तव रखडलेली आहेत. ती आता लवकर निकालात येऊ शकतील.
पोर्तुगिजांनी गोव्यावर तब्बल ४५० वर्षे राज्य केले. अनेक पोर्तुगीज कायदे गोव्यात अजून अंमलात आहेत. आल्वारा जमिनी,कोमुनिदाद संस्था ही पोर्तुगीजांचीच देणगी होय. १९६१ साली गोवा मुक्त झाला. त्याआधीचे पोर्तुगीज कायदे तसेच दस्तऐवज अजूनही वापरले जातात. ते अनुवादीत करण्यासाठी अनुवादक मिळत नाहीत.दरम्यान, समाजकल्याणमंत्री या नात्याने बोलताना फळदेसाई म्हणाले कि,‘ संजय स्कूलचे जे व्यावसायिक वर्ग शिक्षण खात्त्याच्या जुन्या इमारतीत चालतात ते अन्य सुरक्षित इमारतीत हलवले जातील.