Goa: मतदान केंद्रात पोहचण्यासाठी दिव्यांगासाठी उपलब्ध असणार खास ई-रिक्षा
By समीर नाईक | Published: May 4, 2024 04:42 PM2024-05-04T16:42:13+5:302024-05-04T16:43:00+5:30
Goa Lok Sabha Election 2024: गोवा निवडणूक आयोगातर्फे राज्य दिव्यांगजन आयोग यांच्या सहाय्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगासाठी मतदान केंद्रावर आणण्यासाठी आणि पुन्हा घरी पोहचविण्यासाठी खास ई-रिक्षा उपलब्ध करण्यात आले आहे. याबाबतची माहिती राज्य दिव्यांगजन आयोगाचे सचिव ताहा हाजिक यांनी दिली.
- समीर नाईक
पणजी - गोवा निवडणूक आयोगातर्फे राज्य दिव्यांगजन आयोग यांच्या सहाय्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगासाठी मतदान केंद्रावर आणण्यासाठी आणि पुन्हा घरी पोहचविण्यासाठी खास ई-रिक्षा उपलब्ध करण्यात आले आहे. याबाबतची माहिती राज्य दिव्यांगजन आयोगाचे सचिव ताहा हाजिक यांनी दिली.
राज्यभरात व्हीलचेअर मतदार वगळता जवळपास ९५०० दिव्यांग मतदार आहेत. या लोकांना मतदान करताना कुठलीच समस्या येऊ नये यासाठी या ई-रिक्षा उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यभरात एकूण ३० ई-रिक्षा उपलब्ध असणार आहे, असेही हाजिक यांनी यावेळी सांगितले.
दिव्यांग व्यक्तींना मतदान करताना कुठलीच समस्या उद्भवू नये यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आले आहे. राज्यभरात केवळ दिव्यांगयुक्त असे ८ मतदान केंद्र आहेत. या व्यतिरिक्त इतर सर्व मतदान केंद्रावर देखील दिव्यांगासाठी आवश्यक सर्व सुविधा देखील पुरविण्यात येणार आहे. लोकांनी जस्तीस जास्त प्रमाणात बाहेर येऊन मतदान करावे, असे आवाहन हाजीक यांनी केले.