गोव्यात दहावीचा विक्रमी ९१.२७ टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 04:46 PM2018-05-25T16:46:30+5:302018-05-25T16:46:30+5:30

गोवा शालांत मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२७ टक्के इतका लागला आहे. ७८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात २१ सरकारी तर ५७ अनुदानित माध्यमिक विद्यालये आहेत. निकालात मुलींनीच बाजी मारली.

Goa SSC results News | गोव्यात दहावीचा विक्रमी ९१.२७ टक्के निकाल

गोव्यात दहावीचा विक्रमी ९१.२७ टक्के निकाल

googlenewsNext

 पणजी - गोवा शालांत मंडळाने एप्रिलमध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२७ टक्के इतका लागला आहे. ७८ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १00 टक्के लागला असून यात २१ सरकारी तर ५७ अनुदानित माध्यमिक विद्यालये आहेत. निकालात मुलींनीच बाजी मारली.

गोवा शालांत मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत यांनी आज दुपारी पर्वरी येथे पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यावेळी बोर्डाचे सचिव भगिरथ शेट्ये, साहाय्यक सचिव ज्योत्ना सरीन तसेच बोर्डाचे आयटी विभागाचे प्रमुख भरत चोपडे उपस्थित होते. १९,५९६  विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यातील १७,८८६ उत्तीर्ण झाले. एकूण २७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आल्या. काही विषय वगळून परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ६६५ होती. पैकी २५६ उत्तीर्ण झाले. एकूण १0,१५८ मुलगे परीक्षेला बसले त्यातील ९00९ म्हणजेच ८८.६९ टक्के उत्तीर्ण झाले तर १0,0९३ मुलींनी परीक्षा दिली त्यातील ९१३३ म्हणजेच ९0.४९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. गेल्या वर्षी ९१.५७ टक्के इतका निकाल लागला होता. यंदाचा निकाल त्यापेक्षा किंचित कमी आहे.

          क्रीडा गुणांचा ३७६ जणांना प्रत्यक्ष लाभ 

एकूण ८४५१ विद्यार्थ्यांना क्रीडा गुण देण्यात आले. काही विषयांमध्ये नापास झाल्याने उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्यक्षात ३७६ जणांना या गुणांचा लाभ झाला. ही टक्केवारी ४.0४ टक्के इतकी आहे. विक्रमी निकालाची अनेक कारणे सांगितली जात आहेत. नॅशनल स्कीम क्वालिफाइड फ्रेमवर्क अभ्यासक्रम लागू केल्याने हे विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही सहा विषयात उत्तीर्ण झाले तरी उत्तीर्ण घोषित केले जाते. विक्रमी निकालाचे हे एक कारण आहेच शिवाय क्रीडा गुण, व्यावसायिकपूर्व विषय आणि विशेष गरजा असलेल्या मुलांना योग्य त्या सोयी सुविधा दिल्या हीदेखिल विक्रमी निकालाची कारणे असल्याचा दावा त्यांनी केला. 

विशेष मुलांचीही उत्कृष्ट कामगिरी 

दरम्यान, विशेष गरजा असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली. अशा विद्यार्थ्यांसाठी असलेले पर्वरीचे संजय स्कूल, ढवळी व प्रियोळ येथील लोकविश्वासन प्रतिष्ठानचे स्कूल तसेच जुने गोवें येथील झेवियर अकादमी स्कूल या चारही विद्यालयांनी १00 टक्के निकाल प्राप्त केला. 

१५ जूनपासून पुरवणी परीक्षा 

३३ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेल्या आणि ‘सुधारणा हवी’ असा शेरा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी १५ जूनपासून पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी २९ मे ते ७ जून या कालावधीत केवळ आॅनलाइन अर्ज स्वीकारले जातील. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले आहेत आणि त्यांना गुणांमध्ये सुधारणा हवी असेल तर त्यांनीही ही परीक्षा देता येईल. रिव्हॅल्युएशनसाठी १ जूनपर्यंत, उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीसाठी ५ जूनपर्यंत तर व्हेरिफिकेशनसाठी २ जूनपर्यंत अर्ज सादर करता येतील. 

 

गेल्या पाच वर्षातील दहावीचा निकाल

२0१३    -     ८५.३४ टक्के

२0१४  -       ८३.५१ टक्के

२0१५    -     ८५.१५ टक्के

२0१६    -      ९0.९३ टक्के

२0१७    -      ९१.५७ टक्के

Web Title: Goa SSC results News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.