गोवा राज्य हे निसर्गाने भरभरुन दिलेले सुंदर असे ठिकाण : उपराष्ट्रपती जगदीप धनखर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 05:09 PM2023-11-09T17:09:22+5:302023-11-09T17:09:34+5:30

दोनापावला येथील राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या वामन व्रिक्षा कला या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.

Goa State is a beautiful place blessed by nature: Vice President Jagdeep Dhankhar | गोवा राज्य हे निसर्गाने भरभरुन दिलेले सुंदर असे ठिकाण : उपराष्ट्रपती जगदीप धनखर

गोवा राज्य हे निसर्गाने भरभरुन दिलेले सुंदर असे ठिकाण : उपराष्ट्रपती जगदीप धनखर

 नारायण गावस

पणजी: गोवा राज्य हे निसर्गाने भरभरुन दिलेले सुंदर असे ठिकाण आहे. गाेव्याची संस्कृती तसेच मनमिळावू लोक यामुळे गाेव्याचे जगभर अकर्षण वाढत आहे, असे उद्गार उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी काढले. दोनापावला येथील राजभवनच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या वामन व्रिक्षा कला या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार व ऑलम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पी. टी उषा, ज्ञानपिठ साहित्य पुरस्कार विजेत दामोदर मावजो व इतर सदस्य उपस्थित होते. राज्यपालांचे साहित्य क्षेत्रातील कार्य हे कौतुकास्पद आहे. सुमारे २०० पुस्तके लिहीणे तेवढे साेपे नाही भविष्यात त्यांचे कार्य वाढत जावो व त्यांच्याकडून ३०० पुस्तकांचा टप्पा ही पार व्हावा अशा शुभेच्छाही त्यांनी राज्यपालांना दिल्या. त्यांच्या या साहित्याचा येणाऱ्या पुढीला उपयोगी ठरणार आहे, असेही उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी सांगितले.

राज्यपालांचे साहित्य हे खरोखर मार्गदर्शन ठरणारे आहे. त्यांनी आपल्या ५० वर्षातील साहित्य क्षेत्रात चांगले कार्य केेले आहे . त्यांनी गोव्यात राज्यपाल म्हणून पद स्विकारल्यापासून त्यांनी गाेव्यातील ग्रामिण भागात प्रवास करत अनेक विषय पुस्तकरुपात आणले आहे. त्यांची भविष्यात साहित्य क्षेत्राची अशीच वाढ होत राहो, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

Web Title: Goa State is a beautiful place blessed by nature: Vice President Jagdeep Dhankhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.