Goa: विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरण, रंगेल पोलीस अधिकाऱ्याकडून विशाखा समन्सना केराची टोपली
By वासुदेव.पागी | Published: September 4, 2023 06:34 PM2023-09-04T18:34:30+5:302023-09-04T18:35:13+5:30
Goa Crime News: विद्यार्थीनींचा लैंगिक छळ प्रकरणातील त्या रंगेल पोलीस अधिकाऱ्याने गोवा विद्यापीठाच्या विशाखा समितीने चौकशील हजर राण्यासाठी बजावलेले समन्सही जुमानले नाहीत. एकदाही तो चौकशीला उपस्थित राहिला नाही.
- वासुदेव पागी
पणजी - विद्यार्थीनींचा लैंगिक छळ प्रकरणातील त्या रंगेल पोलीस अधिकाऱ्याने गोवा विद्यापीठाच्या विशाखा समितीने चौकशील हजर राण्यासाठी बजावलेले समन्सही जुमानले नाहीत. एकदाही तो चौकशीला उपस्थित राहिला नाही.
पोलीस खात्यात शिकाऊ तत्वावर असलेल्या गोवा विद्यापीठातील दोन विद्यार्थिनींवर पोलीस अधिकाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात विद्यार्थीनींनी तक्रार केल्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याकडून तसेच चौकशी यंत्रणाकडूनही करण्यात आलेल्या बेजबाबदारपणाचा एक एक प्रकार आता उघड होऊ लागला आहे. गोवा विद्यापीठाच्या विशाखा समितीकडून या प्रकरणात सबंधित पोलीसअधिकाऱ्याला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी अनेकवेळा समन्स बजावले. परंतु एकदाही तो चौकशीला उपस्थित राहिला नाही. अनुपस्थितीसाठी कारणे देत राहिला अशी माहिती विद्यापीठातील सूत्रांकडून देण्यात आली. समिती समन्स बजावत राहिली आणि अधिकारी अनुपस्थितीसाठी कारणे देत राहिला आणि बिचाऱ्या पीडीत विद्यार्थिनी न्यायाच्या प्रतीक्षेतच राहिल्या.
एखादा संशयित चौकशीसाठी सहकार्य करीत नसेल तर तसा अहवाल समितीने एक्सपार्टी निवाडा का सुनावला नाही. तसेच चौकशीस सहकार्य न करणाऱ्या त्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई का सुरू करण्यात आली नाही हे प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहेत. समितीकडूनही बेजबाबदारपणा झाल्याचे हे स्पष्ट पुरावे आहेत.
‘१३ सप्टेंबरपर्यंत अहवाल द्या’
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता महिला आयोगाने या प्रकरणात गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील चौकशी अहवाल १३ सप्टेंबरपर्यंत आयोगाने मागविला आहे. चौकशीच केली नाही तर अहवाल कसा देणार हा प्रश्न विद्यापीठाला पडला असेल तर लगबगीने चौकशी करून अहवाल पाठवावा लागणार आहे.