ड्रग्स मुद्यावरून पुन्हा हैद्राबाद पोलिसांडून गोव्याला केले लक्ष्य; गोव्याहून पुरवठा होत असल्याचा दावा
By वासुदेव.पागी | Published: September 12, 2023 06:47 PM2023-09-12T18:47:11+5:302023-09-12T18:47:29+5:30
गोवा पोलीस आणि हैद्राबाद पोलीसांचा ड्रग्सच्या मुद्यावर बऱ्याचवेळा जुंपली होती.
पणजी: ड्रग्सच्या मुद्यावरून गोवा पोलीस आणि हैद्राबाद पोलिसांतील जुंपलेल्या आरोप प्रत्यारोपांच्या युद्धाला बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा ठिणगी मिळाली आहे. हैद्राबाद पोलिसांनी दोघा व्यक्तींना हैद्राबाद येथे ड्रग्ससह अक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्ती गोव्यातील नसल्या तरी त्यांनी गोव्यातून ड्रग्स हैद्राबादला आणला असा हैद्राबाद पोलिसांचा दावा आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे लिंगमपल्ली अनुराधा आणि व्यंकट कुमार अ शी असून त्यांच्याकडे एमडीएमए आणि कोकेन हा घातक अंमली पदार्थ सापडला. दोघांनाही अटक करून त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हैद्राबाद मधील मोकिला पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातही कारवाई झाली.
मोडेल सोनाली फोगाट खून प्रकरणात ड्रग्सचा वापर झाल्याचे आढळून आले होते.
सोनाली हिला ड्रिंग्समधून पाजण्यात आलेले ड्र्ग्स हे हैद्राबाद येथून आणल्याचे उघड झाले होते. त्यानंतर गोवा पोलीस आणि हैद्राबाद पोलीसांचा ड्रग्सच्या मुद्यावर बऱ्याचवेळा जुंपली होती. या वादात गोवा पोलीस महांचालक डॉ जसपाल सिंग यांनीही उडी घेताना हैद्राबाद पोलीसांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले होते.