गोवा : 'मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर शेड्युल्ड ट्राइब्स ऑफ गोवा' च्या शिष्टमंडळाने घेतली डॉ. किरीट सोलंकी यांची भेट
By समीर नाईक | Published: June 11, 2023 02:47 PM2023-06-11T14:47:21+5:302023-06-11T14:48:19+5:30
गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी डॉ. सोलंकीचे या शिष्टमंडळाने आभार मानले.
पणजी: 'मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर शेड्युल्ड ट्राइब्स ऑफ गोवा' च्या शिष्टमंडळाने शनिवारी एससी/एसटी कल्याणासाठी संसदीय समितीचे अध्यक्ष डॉ. किरीट सोलंकी यांची गुजरातमधील अहमदाबाद येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेट घेतलेल्या 'मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर शेड्युल्ड ट्राइब्स ऑफ गोवा' च्या शिष्टमंडळात अध्यक्ष अॅड. जॉन फर्नांडिस, सचिव रूपेश वेळी, प्रवक्ते गोविंद शिरोडकर आणि रवींद्र वेळीप यांचा समावेश होता. गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी डॉ. सोलंकीचे या शिष्टमंडळाने आभार मानले.
डॉ. सोलंकी यांनी ११ ते १३ जानेवारी २०२३ या कालावधीत इतर २९ खासदारांसह गोव्याला दिलेल्या अभ्यास दौऱ्यात गोव्यातील अनुसूचित जमातींसाठी कलम ३३० अन्वये अंतर्गत एससी/एसटी साठी जागा राखीव ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश गोवा सरकारच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यांच्या सूचनांच्या आधारे, राज्य सरकारने गोवा राज्यासाठी सीमांकन आयोग कायदा, अंतर्गत सीमांकन आयोग स्थापन करण्याच्या शिफारशीसह कायदा आणि न्याय मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला.
शिष्टमंडळाने अहमदाबादच्या सध्याच्या भेटीत यांना प्रस्तावाच्या प्रती सादर केल्या ज्या गोवा सरकारने सरकारला पाठवल्या आहेत.
याबाबत आपण केंद्र सरकारकडे वैयक्तिकरित्या पाठपुरावा करू, तसेच आणि संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करणार आहे जेणेकरून गोव्यासाठी परिसीमन आयोगाची स्थापना केली जाईल, गोव्यातील अनुसूचित जमातींसाठी सध्याच्या सरकारच्या या कार्यकाळात म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जागा राखीव ठेवल्या जातील, असे आश्वासन डॉ. सोलंकी यांनी शिष्टमंडळाला दिले.