Goa: प्रॉपर्टी भलत्याचीच, डील ठरविली कोट्यांची, भामट्यांनी घातला २ कोटी २० लाखांचा गंडा
By सूरज.नाईकपवार | Published: December 8, 2023 11:38 AM2023-12-08T11:38:10+5:302023-12-08T11:38:45+5:30
Goa Crime News: भूखंड भलत्याचाच मात्र डील ठरवली कोटींच्या घरात व २ कोटी २० लाखांचा गंडा घालण्याची एक घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी पती पत्नीवर गुन्हा नोंद केला आहे.
- सूरज नाईकपवार
मडगाव - भूखंड भलत्याचाच मात्र डील ठरवली कोटींच्या घरात व २ कोटी २० लाखांचा गंडा घालण्याची एक घटना गोव्यातील सासष्टी तालुक्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी पती पत्नीवर गुन्हा नोंद केला आहे. आग्नेल डिसोझा व मॅकलीन डिसोझा अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात भादंसंच्या ४२०, ४०६,४६५ व ४७४ कलमाखाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. मायणा कुडतरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत वेळीप हे पुढील तपास करीत आहेत. पुढील तपासासाठी आता हे प्रकरण एसआयटीकडे सुपुर्द करण्यात येणार आहे.
संशयित नागवाडो बेताळभाटी येथील रहिवाशी आहे. जीत जैन हे तक्रारदार आहेत. बेलोय नुवे येथील १९ हजार २५० चौ.मी जागा आपल्या स्वत असल्याचे संशयितांने भासविले. जागा मालकीची असल्याची बनावट कागदपत्रकेही दाखविली व सौदा ठरविला. टोकन मनी म्हणून २. २० कोटी रुपये घेण्यात आले. १७ जुलै २०१७ साली वरील प्रकरण घडले होते. त्यानतंर तक्रारदाराला संशयित वाकुल्या दाखवू लागला. नंतर तक्रारदाराने चाैकशी सुरु केली असता, वरील जमिनीचा मूल मालक हा पोर्तुगाल येथे असून, त्यांनी ती जमीन अन्य एकाला विकली होते असे त्यांना काळून चुकले. आपण फसविलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर जैन यांनी नंतर मायणा कुडतरी पोलिस ठाण्यात त्यासंबधीची रितसर तक्रार नोंदविली.