Goa: सनबर्नचे खरे सौंदर्य किनारी भागातच
By काशिराम म्हांबरे | Published: August 26, 2023 05:25 PM2023-08-26T17:25:09+5:302023-08-26T17:25:27+5:30
Goa: सनबर्नचे खरे सौंदर्य किनारी भागात असल्याचे त्याचेआयोजन फक्त किनारी भागात व्हावे याचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी समर्थन केले आहे.
- काशीराम म्हांबरे
सनबर्नचे खरे सौंदर्य किनारी भागात असल्याचे त्याचेआयोजन फक्त किनारी भागात व्हावे याचे कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी समर्थन केले आहे. सरकारला जर सनबर्नचे आयोजन हणजूण किंवा वागातोर या किनारी भागात नको असेल तर तो त्यांनी दक्षिणेतील किनारी भागात अयोजित करावा असे लोबो म्हणाले.
यंदा सनबर्नमोपा येथे आयोजित करण्यावर सरकारी स्तरावर विचार सुरु आहे. त्यावर भाष्य करताना लोबो बोलत होते. गेल्या वर्षी सनबर्नचे आयोजन गोव्याबाहेर करण्यात आले होते. किनारी भागात तो आयोजित होत नसेल तर गोव्या बाहेरच बरा असेही ते म्हणाले.
किनाºयावर त्याचे आयोजन करताना किनारी विभाग प्राधीकारणी, तसेच इतर संबंधीत खात्याकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. तसेच सनबर्नला येणाºया पर्यटकांना अत्यंत चांगल्या सुविधा सनर्बन त्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात याव्यात असेही लोबो म्हणाले. पर्रा येते ते पत्रकारांशी बोलत होते.
मोपाच्या परिसरात कसल्याच प्रकारच्या सुविधा नसल्याचे त्या भागात त्याचे आयोजन करुन कसला उपयोग होणार नसल्याचेही ते म्हणाले. यंदा मोपा आयोजित करण्यासाठी निर्णय घेणे का भाग पाडले याची माहिती आपल्याला नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र मोपात झाल्यास स्थानीकांना व्यवसायिकरित्या कसलाच लाभ होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.
जागतीक स्तरावर आयोजित होणाºया अशा प्रकार मेगा इव्हेंटात सरकार सहभागी होत असतो. राज्य सरकारला सनबर्न पासून महसूल प्राप्त होतो . त्यामुळे अशा इव्हेंटला सरकारी स्तरावरून सहकार्य मिळणे अत्यंत गरजेचे आहे. सरकारच्या वेगवेगळ््या खात्याकडून स्वतंत्र कर घेतला जातो . त्याचाही लाभ महसुलाच्या रुपात होत असल्याची माहिती लोबो यांनी दिली. सध्या तो प्रस्ताव अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही अशीही माहिती यावेळी दिली.