Goa: पणजीत जल वाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया
By समीर नाईक | Published: June 2, 2024 03:58 PM2024-06-02T15:58:24+5:302024-06-02T15:58:57+5:30
Goa News: फार्मसी महाविद्यालयाजवळील काकुलो सर्कल येथे रविवारी सकाळी पिण्याच्या पाण्याची वाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून गेले. यातून ९० टक्के पणजीतील कामे पूर्ण झाली आहे, या स्मार्ट सिटीच्या प्रशासनाच्या दाव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
- समीर नाईक
पणजी - फार्मसी महाविद्यालयाजवळील काकुलो सर्कल येथे रविवारी सकाळी पिण्याच्या पाण्याची वाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाहून गेले. यातून ९० टक्के पणजीतील कामे पूर्ण झाली आहे, या स्मार्ट सिटीच्या प्रशासनाच्या दाव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
स्मार्ट सिटीच्या कामामुळे अनेक महत्वाच्या जल वाहिनीचे नुकसान झाले आहे. याचे ज्वलंत उदाहरण रविवारी पणजीत फार्मसी महाविद्यालयाजवळ पाहायला मिळाले. सकाळी जेव्हा पिण्याचे पाणी सोडण्यात आले, तेव्हा या फुटलेल्या जल वाहिनीतून पाणी थेट रस्त्यावर वाहू लागले. रविवार असल्याने कामगारही या ठिकाणी नव्हते, त्यामुळे जेवढे वेळ पाणी सोडण्यात आले होते, तेवढा वेळ पाणी वाया गेले. नंतर मात्र याचे प्रमाण कमी झाले.
भाटले येथे देखील सरकारी क्वाटर्स समोर गेले ८ दिवस सातत्याने जल वाहिनी फुटल्याने पाणी वाया गेले. यातून आजूबाजूला कामे सुरू असल्याने चिखल देखील झाला, ज्यातून वाट काढणे दुचाकीस्वारांना कठीण बनले होते. स्थानिकांनी वारंवार तक्रार करूनही कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. सदर जल वाहिनी फुटल्याने या भागात पिण्याच्या पाण्याच्या सुरळीत पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली.